नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केस मध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून रू. १३,०९५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये एकुण ०४ ईसमावर कारवाई करून रू. ८८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३५७५ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ५,८६,४००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.