नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केससमध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून रू. ४७,७१२/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये एकुण ०१ ईसमावर कारवाई करून रू. १२.२६०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,१९० वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २,५४,५५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित्त असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.