नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक १५.०६.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केसेस तसेच, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०८ केसेसमध्ये २८ ईसमावर कारवाई करून ७०,६७०/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०४ केसमध्ये ०४ ईसमावर कारवाई करून २,२००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.१८५ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २,४१,५५०/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एम.डी. पावडर बाळगणाऱ्या ०४ आरोपींना अटक, एकुण ३१,८०,५१०/- रू. चा मुद्देमाल जप्त

Mon Jun 17 , 2024
नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत, रहमानीया मस्जीद जवळ, महेंद्र नगर, पाचपावली, नागपूर येथे काही ईसम एम.डी. पावडर खरेदी-विक्री करीता येणार आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन पंचासमक्ष आरोपी १) अझरु‌द्दीन खीमुद्दीन काझी, वय ३७ वर्षे, रा. गल्ली नं. १६, पर नं. ६५५, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com