राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत नागपूरचे खेळाडू चमकले.

नागपूर :-लोणावळा येथील सुमित पॅलेसमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नागपूरचे विद्यार्थी चमकले. स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार मस्के यांच्या हस्ते करण्यात आले होते. बक्षीस वितरण संस्थापक अध्यक्ष पाशा अत्तर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार हाजी दस्तगीर होते. अतिथी म्हणून गौतम चाबूक, रज्जाक मनियार (शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पुणे ), संतोष खैरनार (थाई बॉक्सिंग असोसिएशन इंडिया प्रेसिडेंट) यांची उपस्थिती होती. स्पर्धेत सीनियर वयोगटात तन्मय लघवे -75 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकवला व वैश्नव घूटे -80 वजन गटात प्रथम क्रमांक पटकवला.

या विद्यार्थ्यांची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. विद्यार्थांनी प्रक्षिशक ओम देशमुख आणि नागपूर थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अमीनूद्दीन शेख यांचा आभार व्यक्त केला .

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

15 डिसेंबर ला मतदान यंत्र सिलिंग होणार...

Wed Dec 14 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 14 :- येत्या 18 डिसेंबर ला कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत च्या थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी 90 उमेदवार तसेच 93 प्रभागातील 247 सदस्य पदाच्या निवडीसाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर ही निवडणूक 122 मतदान केंद्रावर होणार असून या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे तर निवडणूक पूर्व मतदानाची तयारी म्हणून आज गुरुवार 15 डिसेंबर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com