स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.23) 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत गांधीबाग येथील वसंत प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत चकना चौक येथील श्री संतोषी स्विटस यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच लकडगंज झोन अंतर्गत लकडगंज येथील साऊथ इंडियन दोसावाला यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत प्लॉट नं.15 हिल रोड, गांधीनगर येथील स्पा व्हिला यांच्याविरुध्द रस्त्यालगत स्पा व्हिला कचरा फेकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत वाठोडा चौक येथील न्यू रंजन बेकरी ॲण्ड रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द रस्त्यालगत रेस्टॉरेन्टचा कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मंगलवारी झोन अंतर्गत बालाजी टाऊन येथील करण वर्मा यांच्याविरुध्द परवानगीशिवाय झाडे तोडून रस्त्यावर फेकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विज्ञान, तंत्रज्ञान आयुष्याचा अविभाज्य भाग असून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी - बिरजुला मेश्राम

Sun Sep 25 , 2022
मानवता शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमीत्त 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांनी साकारल्या 85 अभिनव प्रतिकृती नागपुर – प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा एक व्यासपीठ आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आयुष्याचा अविभाज्य भाग असून सर्वांनी विज्ञानाची कास धरावी, असे प्रतिपादन नव-युवक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा बिरजुला मेश्राम यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त कुंजीलालपेठ, रामेश्वरी मार्गावरील नव-युवक एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मानवता प्राथमिक व हायस्कूल येथे दोन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com