सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 242 प्रकरणांची नोंद – उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (19) रोजी शोध पथकाने 242 प्रकरणांची नोंद करून 123600 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 20 प्रकरणांची नोंद करून रु 4000 रुपयांचा दंड वसुल केला. सगळयांवर प्रत्येकी रु ४०० प्रमाणे दंड लावण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणा-यांवर 1 प्रकरणांची नोंद करुन रु 1000 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 83 प्रकरणांची नोंद करून 33200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 46 प्रकरणांची नोंद करून 4600 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून रु 7600 दंड वसूल करण्यात आलेला आहे.

दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आला. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आला. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बद करणे (मनपाच्या धोरणानुसार कार्यवाही करणे) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन रु 5000 दंड वसूल करण्यात आला. वैद्यकीय व्यवसायिकांनी बायोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कच-यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन रु 40000 दंड वसूल करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर 56 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 11200 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. तसेच उपद्रव करणा-या संस्थांकडून 11 प्रकरणांमध्ये 11000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख  वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे  नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे  सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्या करणाऱ्या रुग्णाला रूगणालयात भेटुन योग्य चौकशी करून जीवनमुल्य सल्ला दिला !!

Thu Oct 20 , 2022
मुंबई :- विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्यावर मुंबईतील सर जे. जे. इस्पितळात उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज रुग्णालयात जाऊन रमेश केरे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांचीही माहिती घेतली. परमेश्वराने दिलेल्या जीवनाकडे आपण सकारात्मक दृष्टीने पहाणे आवश्यक असून जीवनातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com