रामटेक :- रामटेक शहरात वैकुंठ चतूर्थदशी निम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू होते. पहिल्या दिवशी शोभायात्रा , दुसऱ्या दिवशी त्रिपुर पौर्णिमा व रथ यात्रा , तर तिसरा आणि शेवटचा दिवस म्हंजे मंडई. रामटेककरांसह संपूर्ण तालुक्यातील लोकांनी मंडई चा आनंद घेतला. ठिकठिकाणी तमाशा, नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
नगर परिषद रामटेक तर्फे शाहीर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले . नगर परिषद रामटेक तर्फे तमाशा ला १० हजार रुपये , दंडार ला ११ हजार रुपये , व नाटक मंडळाला १२ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी
माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी ,नगराध्यक्ष दिलीप देशमुख,नगर परिषद उपाध्यक्ष आलोक मानकर,नगरसेवक प्रभाकर खेडकर, समाजसेवक गोपी कोल्लेपरा, ज्योती कोल्लेपरा , उमेश पटले,रजत गजभिये, अतुल पोटभरे सह आदी उपस्थित होते..