नगरपंचायत बिडगाव तरोड़ी (खुर्द ) पांढुर्णामध्ये १६ जानेवारीला विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- केंद्र शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवन्याकारिता विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचे शासनातर्फे आयोजन करण्यात आलेले आहे.ही यात्रा दिनांक १६ जानेवारीला मंगळवार दुपारी ३ वाजता बिडगाव चौक, नगरपंचायत कार्यालयाजवळ, नगर पंचायत बिडगाव तरोड़ी (खुर्द ) पांढुर्णा येथे आयोजित करण्यात आले आहे . सदर मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजना ,प्रधानमंत्री आवास योजना,आयुष्यमान भारत योजना,प्रधानमंत्री उज्वला योजना,बैंकमार्फ़त विविध कर्ज योजना,आधार अपडेट,आरोग्य शिबीर,इ विविध योजनाची माहिती व लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.

तरी नागरिकांना सदर संकल्प यात्रेत सहभागी होवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहन बिडगाव नगर पंचायत चे प्रशासक संदीप बोरकर यांनी नागरिकांना केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आत्मनिर्भर आदिवासी केंद्रबिंदू ठरवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Mon Jan 15 , 2024
नागपूर :- आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी विविध योजना शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. आदिवासी समाज हा बहुसंख्येने अतिदुर्गम भागात राहत असून त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती व्हायला पाहिजे. सोबतच रोजगारामुळे मूळ रहिवास सोडून आदिवासी समाज शहरी भागात पलायन करीत आहे. त्यासाठी त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणीच शेतीसह पूरक पशुपालन हा उद्योग करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केल्यास त्यांचे पलायन होणार नाही व आदिवासी समाज आत्मनिर्भर बनेल, असे निर्देश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com