नागपूर :- पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत गल्ली नं. २, दहीकर झेंडया जवळ, ईमामवाडा, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी नामे कमला दयाराम पाटनकर वय ६५ वर्षे, यांचा दीर नामे सोनू उर्फ दिपक विजय वासनिक वय ४४ वर्ष, रा. वर्धा हा जिल्हा वर्धा येथुन एम.पी.डी.ए चा आरोपी होता. व तो नुकताच वर्धा येथून रिलीज झाला होता. व फिर्यादी कडे आला होता. फिर्यादीचे घरा शेजारी राहणारे आरोपी क. १) आकाश प्रफुल मेश्राम वय २८ वर्ष, २) सोनू रामटेके ३) दत्तू पसेरकर सर्व रा. रामबाग, गल्ली नं. २. दहीकर झेंडया जवळ, नागपूर हे व फिर्यादीचा दीर यांनी सोबत दारू पिली दारू पिल्यानंतर त्यांनी आपसात भांडण करून आरोपी क. १ ते ३ यांनी संगणमत करून फिर्यादीचा दीर सोनू उर्फ दिपक वासनिक यास डोक्यावर दगडाने मारून गंभीर जखमी केले. जखमी यास उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे ईमामवाडा येथे पोहवा. छन्ना यांनी आरोपींविरूध्द कलम १०३(१), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क. १ यास अटक केली आहे. ईतर आरोपींचा शोध सुरू आहे.