चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात नदीकडील भागात पुरग्रस्त क्षेत्रात व विकास योजनेनुसार आरक्षित जागेवर काही अनधिकृत लेआऊट पाडुन भुखंड नोटरी पद्धतीने विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. करीता सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येत आहे कि, पूरग्रस्त क्षेत्रात व आरक्षित जागेवरील अनधिकृत अभिन्यासातील भूखंड/ बांधकाम कृपया खरेदी करू नये, अन्यथा अशा जागेवरील अनधिकृत अभिन्यासातील भूखंड / बांधकाम संबंधी काही अपरिहार्य घेताना घडल्यास त्याबाबत कुठलीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. हानी व याबाबत सदर व्यक्ती स्वतः जबाबदार राहणार असल्याचा इशारा चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे देण्यात येत आहे.
पुरग्रस्त भागातील बांधकामासंबंधी मनपाचा इशारा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com