५९ महिन्याच्या थकबाकीबाबत मनपा सकारात्मक

– आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली मनपा आयुक्‍तांसह समस्या निवारण सभा

नागपूर :- शालार्थ प्रणालीत समाविष्ठ असलेले शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सहाव्‍या वेतन आयोगाची एकूण ५९ महिन्‍यांची थकबाकीची देयके प्रलंबित असल्‍याने मनपा शिक्षक – कर्मचाऱ्यांत नाराजी व्‍यक्‍त होत आहे. त्‍यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतलेल्‍या बैठकीत सदर विषयावर मनपाने सकारात्‍मकतेने सदर विषय सोडवून मनपा कर्मचाऱ्यांना न्‍याय द्यावा, अशी मागणी केली. यावर सहाव्या वेतन आयोगाच्या ५९ महिन्याच्या थकबाकी मिळण्यासंदर्भांत पुढील कार्यवाही करू, असे आयुक्‍तांनी सांगितले.

विमाशी संघाच्या ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या उपक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिका अंतर्गत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍या निवारणार्थ आमदार सुधाकर अडबाले यांनी मनपा आयुक्‍त यांच्यासोबत ११ ऑक्‍टोंबर २०२४ रोजी समस्या निवारण सभा घेतली.

सभेच्या सुरुवातीला ४ सप्‍टेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सभेच्या इतिवृत्तावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मनपा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता देण्यात यावा, दरमहा १ तारखेला वेतन अदा करण्यात यावे, शिक्षक, मुख्याध्यापकांची तसेच मनपा शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी व शाळा निरीक्षकांची रिक्‍त पदे तात्‍काळ भरण्यात यावी, निवडश्रेणी, महागाई भत्त्याची थकबाकी अदा करण्यात यावी व इतर अनेक सामूहिक, वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. मनपा शिक्षकांना बीएलओ या अशैक्षणिक कामांतून मुक्‍तता करावी, याबाबत जिल्‍हाधिकारी यांना पत्र लिहून मागणी करावी तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी जीपीएफ धनादेश देण्याबाबत मनपाने कार्यवाही करावी, दिवाळीपूर्वी वेतन अदा करा, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी मनपा अधिकाऱ्यांना केल्‍या. बैठकीला मनपा आयुक्‍त डॉ. अभिजीत चौधरी, उपायुक्‍त गाेयल, शिक्षणाधिकारी सयाम, उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे व अन्‍य अधिकारी उपस्‍थित होते.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बढे, विजय गोमकर, लक्ष्मीकांत व्होरा, मंगेश घवघवे, अरुण कराळे, उपाध्यक्ष राकेश दुमपलवार, मधुकर भोयर, मानकर, देवराव मांडवकर, प्रकाश गजभिये, दीपक सातपुते, नरेंद्र घुगल, चंद्रकांत ठाकरे, महेंद्र बोस, विनायक कुथे, प्रफुल्ल चरडे, माया गेडाम, नुतन चोपडे, निजाम, सय्यद हसन अलीसार, सुधाकर गुढघे, नावेद, श्याम गोहकर, पदाधिकारी व मनपा शिक्षकवृंद उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिव्हिल लाईन्स वॉकर स्ट्रीट येथील स्मार्ट टॉयलेटचे लोकार्पण

Tue Oct 15 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे सिव्हिल लाईन्स येथील वॉकर स्ट्रीट परिसरातील ‘स्मार्ट स्वच्छतागृहाचे’ मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते सोमवारी (ता:१४) लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त प्रकाश वराडे, डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (स्लम) कमलेश चव्हाण, देवेन्द्र भोवते, वॉकर्स क्लबचे प्रशांत उगेमुगे, दिनेश नायडू प्रवीण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com