सुदर्शन नगरातील मोठ्या नाल्याच्या सुरक्षा भिंती चे निर्माणकार्य सुरु, माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या पाठपुराव्याला यश 1 कोटी 82 लाखांचा निधि मंजूर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

1 कोटी 82 लाखांचा निधि मंजूर

कामठी :- येथील सुदर्शन नगर-गौतम नगरातुन वाहणाऱ्या नाल्याच्या सुरक्षा भिंती चे बांधकाम आज पासुन सुरु करण्यात आले, माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या उपस्थितित भूमिपूजन आज गुरुवारी सकाळी करण्यात आले.

चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री असताना महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत पर्जन्य जलवाहिणी पोरवाल कॉलेज-गौतम नगर-सुदर्शन नगर-डंपिंग यार्ड नाला बांधकामा करिता 1 करोड़ 82 लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. महाविकास आघाडी शासन असताना बांधकाम बंद होते, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे काही दिवसा पूर्वी नगर परिषद प्रांगणात आयोजित कार्यक्रमात आले असता स्थानिक भाजपा नगरसेविका संध्या रायबोले यांनी याबाबत निवेदन देऊन पावसाळ्या पुर्वी नाला सुरक्षा भिंत बांधकामाची मागणी केली होती, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशा वरून काम तातडीने सुरु करण्यात आले आहे.

– पोरवाल महाविद्यालय ते डंपिंग यार्ड दरम्यान वाहणाऱ्या नाल्याला सुरक्षा भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत होते त्या मुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते याबाबत वारंवार प्रशासना कडे पाठपुरावा करण्यात आला

-संध्या रायबोले, माजी नगरसेविका 

भूमिपूजन कार्यक्रमात गेंदलाल कलसे,गणेश बरोंडे,मन्नु तांबे,शानू ग्रावकर,चेतन बरोंडे,करण ग्रावकर, राजु मेथिया , नितिन मनपिया, आशिष मधुमटके , कमल सकतेल, मनीष डकाह,सोमनाथ ग्रावकर,ओम बरोंडे, रोशन पसेरकर,चंदा बरसे, मिना मनपिया, कांचन ग्रावकर आदी उपस्थित होते.

नाला सुरक्षा भिंत बांधकाम सुरु केल्या बद्द्ल स्थानिक रहिवाश्यानी माजी पालकमंत्री आ चंद्रशेखर बावनकुळे , माजी नगरसेविका संध्या रायबोले, भाजपा महामंत्री उज्वल रायबोले यांचे आभार मानले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com