आरोग्य विषयक उपक्रमात मनपा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

– डॉ. बहिरवारांचा सत्कार

नागपूर :-  दि. ४/०७/२०२३ मंगळवार रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा प्रकल्प अंमलबजावणी आराखडयाबाबत Orientation आणि Dissemination या विषयावर मा. अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांचे उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व उपसंचालक, आरोग्य सेवा, परिमंडळ (सर्व), जिल्हा शल्य चिकीत्सक (सर्व), जिल्हा समान्य रुग्णालय (सर्व), जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. (सर्व), प्राचार्य, कु.क.व प्रशिक्षण केंद्र (सर्व), वैद्यकिय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका (सर्व), परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक (सर्व), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (सर्व) यांची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.

सदर कार्यशाळेमध्ये डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका यांनी उपस्थिती दर्शविलेली होती. या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य विषयक उपक्रम व कार्यक्रमामंध्ये नागपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकां मधुन दुसरा क्रमांक पटकाविलेला आहे. सर्व कार्यक्रम आयुक्त, म.न.पा नागपूर व अति. आयुक्त, म.न.पा नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. त्या अनुषंघाने डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, म.न.पा. नागपूर यांचे आरोग्य विभागातील उत्कृष्ठ कामगीरीकरीता सत्कार करण्यात आला. डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांनी याचे संपुर्ण श्रेय डॉ. विजय जोशी, अति. वैद्यकिय आरोग्य अधिकारी, डॉ. सरला लाड, माता व बालसंगोपण अधिकारी, म.न.पा. नागपूर तसेच डॉ. अश्विनी निकम, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, एन.यु.एच.एम, निलेश बाभरे, शहर लेखा व्यवस्थापक, डॉ. राजेश बुरे, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक व म.न.पा. नागपूर कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व वैद्यकिय अधिकारी व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी यांना दिलेले आहे व त्याकरीता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केलेले आहे.

तसेच म.न.पा. दवाखाने, डागा शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकिय रुग्णालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकिय रुग्णालय व खाजगी आंतररुग्णालये येथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सौ. दिपाली नागरे, स्टाफ नर्स व सौ. दिपाली गणोरकर, स्टाफ नर्स व प्रियंका मोहिते व प्रफुल्ल किनीकर यांनी देखील सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मोलाचे कार्य केलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

President of India Droupadi Murmu visited the Siddhivinayak Mandir in Mumbai

Fri Jul 7 , 2023
Mumbai :- President of India Droupadi Murmu visited the Siddhivinayak Mandir in Mumbai. Maharashtra Governor Ramesh Bais was also present. Chairman of Shree Siddhivinayak Temple Trust Aadesh Bandekar welcomed the President. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com