नागपूर :-नागपूर महानगरपालिकेतर्फे “नागरी स्थानिक नियोजनासाठी नागपुरातील पुराचा धोका आणि उष्णतेच्या लाटेचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण” या विषयावर मंगळवारी कार्यशाळा (Geospatial Analysis of Flood Risk and Heat Wave in Nagpur City for Urban Local Planning) घेण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर होते.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, उपायुक्त प्रकाश वराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर, स.प्र.विचे सहाय्यक अधीक्षक राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, शिक्षण विभागाचे मनोज लोखंडे, संजय दिघोरे, नंदकिशोर शेंडे, वाहतूक विभागाचे आनंद लामसोंगे, राहुल देशमुख, श्वेता दांडेकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, यूएनडीपी च्या शहर समन्वयक आरुषा आनंद, अल्यूव्हियमचे पार्थ गोयल, आकाश मलिक, जाला अलोरा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
भौगोलिक-स्थानिक विश्लेषण करण्याच्या दृष्टीने आयोजित कार्यशाळेत यूएनडीपी अल्यूव्हियम इंटरनॅशनल व अल्यूव्हियम कंस्लटेंसी इंडिया यांच्याद्वारे संगणकीय सादरीकरण करीत चर्चासत्र घेण्यात आले. नागपूर शहराचा पूरस्थिती पासून बचाव, आपत्ती जोखीम व्यवस्थापन, पूरपरिस्थीची तयारी, प्रतिसाद आणि नुकसान भरपाई या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पूरपरिस्थिती वर मात करण्यासाठी नियोजन व उपाययोजना आवश्यक आहे असे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी दिले
नागपूर शहरातील नाग नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणारी व पूर येण्यास कारणीभूत असणारे विविध कारण तसेच वातावरण बदलामुळे वाढते तापमान यावर करण्यात आलेल्या विश्लेषण अध्ययनाची माहितीचा आढावा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी घेतला. बदलत्या वातावरणाची चिन्हे, पुरामुळे शहरातील जास्त प्रभावित होणारे क्षेत्र, नागरिकांमध्ये बदलत्या वातावरणाविषयी माहिती व जागरूकता आणि पूरस्थिती सांभाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात यावे. उपलब्ध सर्व माहितीवरून येणाऱ्या काळात नियोजन करावे याबाबत अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी सूचना देखील दिल्या. यावेळी “वेब अँप ” याविषयी माहिती देण्यात आली. या अँप द्वारे आपत्तीजनक स्थितीचे नियोजन कसे करता येईल याविषयी देखील चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेत अॅल्यूव्हियमचे पार्थ गोयल आकाश मलिक, तरीया गुलाटी यांनी संगणकीय सादरीकरण केले.पावसाळ्यात उत्पन्न होणारी परिस्थिती व उष्णतेच्या लाटेच्या धोक्याचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण कार्याच्या पद्धती विषयी माहिती दिली. तसेच विश्लेषणाची माहिती पुस्तिका, नकाशे व सर्वसमावेश आपत्ती व्यवस्थापक नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले.