नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.12) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली आणि गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न.33, रामेश्वरी रोड येथील सचिन इन्टरप्राईजेस ॲण्ड रेडिमेड गारमेंट यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत टेलिफोन एक्सचेंज चौक येथील चिंतामणी किराणा स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत रामनगर चौक येथील मिल्टन टॉईस या दुकानाविरुध्द दुकानातील वस्तु रस्त्यालगत फुटपाथवर प्रदर्शित करुन ठेवल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत केसर माता नगर, हुडकेश्वर येथील श्री रेसिडेन्सी यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.गांधीबाग झोन अंतर्गत डागा हॉस्पीटल जवळील स्माईल पॅथॉलोजि लॅब यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा फेकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत प्रभाग न.7, कमाल बाजार चौक येथील दिशा कम्प्युटर यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर डिस्प्ले बॅनर व होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मंगलवारी झोन अंतर्गत चौधरी चौक, जरिपटका येथील वासवानी बिल्डर्स रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.