– शाळेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
चंद्रपूर :- इयत्ता १० वीचा निकाल घोषित झाला असुन चंद्रपूर महानगरपालिकेच्या पी एम श्री सावित्रीबाई फुले शाळेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या नेतृत्वात मनपा शाळेचा शैक्षणिक स्तर सातत्याने उंचावत असुन मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांच्या योगदानाने उत्कृष्ट निकाल देण्यात मनपा शाळा यशस्वी होत आहे.
एकीकडे मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा कल कमी होत असतांना बाबुपेठ येथील पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक मनपा शाळा याला अपवाद ठरली आहे. येथे असलेली हजाराच्यावर विद्यार्थी संख्या, शाळेची गुणवत्ता, दर्जेदार शिक्षण आणि विशेष म्हणजे इंग्रजी कॉन्व्हेंट सोडून येथे शिक्षण घेत आहेत. या परीक्षेत शाळेतील दिव्यांग विद्यार्थी साहिल मावलीकर यांने ७१ टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे.
याच शाळेत सन २०१४ मध्ये केवळ १०० विद्यार्थीसंख्या होती. तर आज मात्र जवळपास ११०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे. कॉन्व्हेंट सोडून या शाळेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा काही वर्गात लक्षणीय आहे, ही शहरासाठी गौरवाची बाब आहे. शासकीय मराठी शाळेत शिक्षणाची गुणवत्ता वाढविल्यामुळे आणि महानगरपालिका प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शाळेने हा मैलाचा दगड पार केला आहे
मनपा आयुक्त विपीन पालीवाल,अति.आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळा यशाचे नवीन टप्पे गाठत असुन उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत,ववर्ग शिक्षक अरूण वलके ,विषय शिक्षक सचिन रामटेके,भास्कर गेडाम ,मोनाली भोयर, बबली जंगम सर्व शिक्षक वृंद तसेच आपल्या आई वडीलांना दिले आहे.