मनपाच्या पुष्पोत्सव प्रदर्शनाचा आज समारोप 

– लता मंगेशकर उद्यान सजले विविध प्रजातींच्या नानाविध फुलांनी 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे पूर्व नागपुरातील लता मंगेशकर उद्यानात पहिल्यांदाच आयोजित ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाचा बुधवारी (ता. १४) समारोप होणार आहे. विविध प्रजातींच्या नानाविध फुलांची प्रदर्शनी पाहण्यासाठी या पुष्प प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात उद्यान विभागाद्वारे पूर्व नागपुरातील लता मंगेशकर उद्यानात पहिल्यांदाच मनमोहक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

चार दिवसीय चालणाऱ्या पुष्पोत्सवा प्रदर्शनाला नागरिक, शालेय विद्यार्थी आणि पुष्पप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुष्पोत्सव फुलांच्या प्रदर्शनासह त्यांची माहिती देखील दिली जाते. लता मंगेशकर उद्यानात पुष्प प्रदर्शनासह उभारण्यात आलेली विशाल बासरी, रेल्वे गाडी यासह विविध सेल्फी पॉईंट आकर्षणाचा विषय आहे.

पुष्पोत्सव प्रदर्शनात झेंडू, पिटोनिया, डायनथस, देहेलिया, गुलाब, जर्बेरा, कॅलेंडुला, प्लँटेला, झिनिया यासारखे १०० हून अधिक सीजनल व पेरॅनियल फुलांचे प्रकार व विभिन्न प्रजातींची फुले, औषधी वनस्पतीची झाडे एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळत आहेत. याशिवाय या फुलांच्या संदर्भात सविस्तर माहिती देखील तज्ज्ञांमार्फत नागरिकांना दिली जात आहे. बुधवार (ता.१४) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून नागरिकांनी पुष्पोत्सव २०२४’ ला भेट द्यावी असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor inaugurates 63rd State Art Exhibition

Wed Feb 14 , 2024
– Presents Vasudeo Gaitonde Life Time Award to Graphic Designer Arun Kale Mumbai :- The 63rd Maharashtra State Art Exhibition organized by the Directorate of Arts, Government of Maharashtra was inaugurated by Governor Ramesh Bais at Jehangir Art Gallery in Mumbai. The Governor presented the ‘Late Vasudeo Gaitonde Kala Jeevan Gaurav Award’ to senior graphic design artist Arun Padmanabh Kale. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com