मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली मतदानाची शपथ

– राष्ट्रीय मतदार दिवस : नवमतदारांचा मनपाद्वारे सन्मान

नागपूर :- नागपूर महानगरपालिका मुख्यालय आणि सर्व झोन कार्यालयांमध्ये शुक्रवारी (ता.२४) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनामध्ये मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाची शपथ घेतली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त  विजया बनकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अभियंता  लीना उपाध्ये, सहायक आयुक्त श्याम कापसे, सहायक अधिक्षक राजकुमार मेश्राम, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, निवडणूक विभागाचे अनंत नागमोते, सहा. शिक्षणाधिकारी सुभाष उपासे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे नवमतदारांचा सन्मान करण्यात आला. वयाची १८ वर्षे पूर्ण करुन मतदानाचा हक्क बजावणारे इयत्ता १२वी चे विद्यार्थी सायमा फिरोज खान, शिरीन परवीन इरफान खान, अब्दुल रहमान हबीब उर रहमान आणि क्वाईस शेख यांचा तुळशी रोप आणि मनपाचा मानाचा दुपट्टा देउन अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अभियंता लीना उपाध्ये यांनी सत्कार केला.

जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व त्यांनी सर्व उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मनपाच्या ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाचे थाटात उदघाटन

Tue Jan 28 , 2025
– शहरातील १५ उद्यानांमध्ये ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनी : शंभरावर प्रजातींची फुले पाहण्याची अनोखी संधी नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात उदघाटन झाले. मनपा आयुक्तांनी शनिवारी (ता.२५) त्रिमूर्ती नगर येथील राजीव गांधी ‘ग्लो गार्डन’ येथे ‘पुष्पोत्सव २०२५’चे शुभारंभ केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!