सीताबर्डी येथे मनपाची अवैध पथविक्रेत्याच्या विरोधात धडक कारवाई

नागपूर :- सीताबर्डी येथे मनपाच्या प्रवर्तन विभागातर्फे अवैध पथविक्रेत्याच्या विरोधात मंगळवार (ता. ७) रोजी सकाळपासून धडक कारवाई करण्यात आली.

आज मंगळवार रोजी सकाळपासून मनपाच्या प्रवर्तन विभागातर्फे सीताबर्डीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईला सुरूवात करण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्त अर्चित चांडक, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, सीताबर्डी पोलिस विभाग प्रमुख एएसआई प्रेम वाघमारे, मनपाच्या अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त हरीश राऊत उपस्थित होते. सहायक आयुक्त हरीश राउत यांच्या मार्गदशनाखाली, अतिक्रमण पथक प्रमुख भास्कर माळवे, शहदाब खान, संजय कांबळे, उपद्रव्य शोध पथकाचे सुधीर सुडके, विजय पिल्ले, मंजल पटले यांच्या पथकाने सकाळी ११ वाजेपासून टेम्पल रोडवरील महाजन मार्केट येथे महानगरपालिकेच्या निवारा केंद्राजवळील हातठेले, पानटपरीचे दुकाने यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर पथकातर्फे, मानस चौक, मोदी नंबर १,२ आणि ३ आणि व्हेरायटी चौक, पंचशील चौक येथे कारवाई केली. यावेळी एकून ७ ट्रक माल जप्त करण्यात आले. यात हातठेले, कपड्याचे स्टॅन्ड, काउंटर, स्टॅचू दुकानाचे साईन बोर्ड यांचा समावेश होता. ही कारवाई मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. महाल नंगा पुतला, इतवारी, टी.व्ही. टावर सेमिनरी हिल्स येथे ही प्रवर्तन पथकाने कारवाई केली.

१०० पोलिसांचा विशेष ताफा गठित

महापालिका आयुक्तांच्या पाहणीनंतर पोलिस आयुक्तालयात आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात आवश्यक उपाययोजनांबाबत बैठक झाली. यामध्ये अतिक्रमण कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १०० पोलिसांचा विशेष ताफा गठित करण्याचा निर्णय झाला आहे. हा ताफा महापालिकेकडून शहरात ज्याठिकाणी कारवाई होईल तिथे सहकार्य करेल, असा निर्णय घेतला. अतिक्रमण काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष ताफ्याच्या सहकार्याने महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यांना मोकळे करण्याची कारवाई सुरू झाली आहे. अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांची वाहने, ठेले, इतर विक्रेत्यांचे हातठेले सर्रासपणे उभे राहत असल्याने वाहतुकीला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. काही रस्त्यांवर तर यामुळे वाहतूक कोडींची समस्याही निर्माण होत असते. यासाठी पोलिसांचे विशेष पथक उपलब्ध झाल्याने या कारवाई अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. कारवाई करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,ऑनलाईन अर्ज करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Wed Jan 8 , 2025
गडचिरोली :- अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने दि.26 डिसेंबर 2024 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!