नागपूर :- बुधवार दिनांक 26 जुलै रोजी, आयुक्त म.न.पा. यांना निवेदन दिले की, प्रभाग क्रमांक 30 येथे, जवळपास 130 ते 135 सफाई कर्मचारी काम करतात. त्यापैकी फक्त 50% सफाई कर्मचारी कामावर असतात. पण पगार मात्र सगळे 90% सफाई कामगारांचा निघतो. मग 40% सफाई कामगारांचा पगार कोण काढतो असा प्रश्न निर्माण होतो. हा सर्व घोळ प्रभागातील जमादार व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने होत आहे. असा संशय येत असल्याची माहिती माथाडी कामगार सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष सिध्दु कोमजवार यांनी आयुक्तांना दिली.
जवळपास एका प्रभागातुन 2 ते 3 लाख रुपयांचा महिन्याच्या घोळ होत आहे. तर नागपूर शहरात 34 प्रभाग आहे. म्हणजे जवळपास प्रती महिना 1 करोड रुपयांचा घोळ होतो आहे. आता महानगरपालिकेचे दिड वर्ष निघून गेले तर या दिड वर्षात करोडो रुपयांची लूट महानगर पालिकेने जनतेची केली आहे. प्रभाग क्रमांक 30 मध्ये हे सर्व करण्यासाठी एका सफाई कामगाराला जमादाराची पोस्ट देण्यात आली आहे. तो प्रभाग कामाकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेची लूट कशी करण्यात येईल याकडे लक्ष देत आहे. त्या सफाई कामगाराची प्रभागातुन वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. यावरून संशय येतो की, वरिष्ठांच्या आशिर्वादाने हे सर्व होत आहे. तरी यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी व जनतेची लूट थांबवावी. अशी विनंती आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. त्याचप्रमाणे आशीर्वाद नगर गार्डन बाबतच्या समस्याबाबत सुद्दा आयुक्त यांचेशी चर्चा करण्यात आली. तसेच म.न.पा.उपायुक्त महाल्ले यांना सुद्धा शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून आशिर्वाद नगर एनआयटी गार्डन संबधित अनेक समस्या बाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी रविवारी 30 जुलै 23 ला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान आशीर्वाद नगर गार्डन ला प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले. यावेळी माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सिध्दु कोमजवार, जेष्ठ नागरिक गार्डन क्लबचे अध्यक्ष वामन साळवे, श्याम कामत, प्रल्हाद शेंडे, विजय कडु, ईटनकर नरेंद्र बनाफर, खेडकर, हिमांशू सहारे, इत्यादी उपस्थित होते.