करवसुली पथकांना धमकी प्रकरणी मनपातर्फे पोलीस तक्रार 106 मालमत्ता जप्त,60 नळ कनेक्शन कपात

चंद्रपूर :- मालमत्ता व नळकर वसुली करणाऱ्या मनपा पथकास शिवीगाळ केल्या प्रकरणी राजीव गांधी नगर एकता चौक येथील संगीता किशोर भेलोंडे व इतरांवर भारतीय न्याय संहिता कलम 221 व 352 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिकेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांचा अश्लील शिवीगाळ करतांनाचा व्हिडीओ पुरावा म्हणुन सादर करण्यात आला आहे.

बुधवार 26 फेब्रुवारी रोजी मनपा कर वसुली पथक राजीव गांधी नगर, एकता चौक येथील संगीता किशोर भेलोंडे या थकबाकीदाराकडे कारवाई करण्यास गेले असता त्यांनी कर भरणा करण्यास नकार देऊन इतर लोकांच्या मदतीने मनपा पथकास शिवीगाळ करण्यास सुरवात केली. कर भरणा न केल्यास 2 दिवसानंतर नळ कपात व मालमत्ता जप्त करण्याच्या सुचना त्यांना यापुर्वी देण्यात आल्या होत्या,मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करून मनपा कर्मचाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.त्यामुळे मनपातर्फे भारतीय न्याय संहिता कलम 221 व 352 नुसार गुन्हा दाखल करण्यास रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

कर भरणा करण्याचा शेवटचा महिना मार्च असल्याने थकबाकीदारांकडे मनपा कर वसुली पथकाद्वारे वसुली मोहीम राबविली जात आहे. करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे 15 पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान 10 मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार आतापर्यंत 60 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले असुन 106 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तरी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी त्वरित कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची कामठीत सदिच्छा भेट

Mon Mar 3 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कामठी शहरातील गोकुलधाम येथे नुकतीच सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी माँ भगवती सेवा समिती कामठी चे प्रमुख पूजा सफेलकर यांच्या वतीने पुष्पगुच्छ,शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या खात्यांमार्फत राज्यातील विविध विकास योजनांची माहिती दिली.यासोबतच जनकल्याण योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे सहकार्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!