मनपातर्फे पोषण आहाराविषयी करण्यात आली जनजागृती

– 1 वर्षात 630 बाह्यसत्र  

– गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

चंद्रपूर :- चंद्रपुर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे 2024-2025 या वर्षात एकुण 630 बाह्य शिबिरे घेण्यात येऊन गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मनपा आरोग्य विभागांतर्गत सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत नागरी आरोग्य व पोषण दिवस/अर्बन हेल्थ न्युट्रिशन डे (UHND) वर्षभर साजरा करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने पोषण आहारा विषयी प्राधान्याने झोपडप‌ट्टीत राहणाऱ्या नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत असते. 2024-2025 या वर्षभरात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मार्फत प्रत्येक झोन व अंगणवाडीमध्ये अंदाजे 630 बाह्यसत्र (UHND) घेण्यात आले.

या सत्रांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुली यांचा प्रामुख्याने समावेश होता. पोषण आहारामध्ये समतोल आहार जसे की पालेभाज्या, फळे, दुध, अंडे, मोड आलेले कडधान्य इत्यादी फुड पीरॅमिडनुसार प्रदर्शन ठेवून त्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींना मासीक पाळी दरम्यान स्वच्छता पाळण्या विषयीच्या सुचना देण्यात आल्या.

तसेच वर्षभर झालेल्या सर्व सत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जसे लोहयुक्त आहार, प्रोटीन युक्त आहार, कुटूंब नियोजनाचे साधने, स्तनपान, जलजन्य, किटकजन्य आजार, सिकलसेल, कुष्ठरोग, टि.बी, कॅन्सर आणि जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. सत्रात उपस्थित लाभार्थ्यांना शेंगदाणा चिकी, राजगिरा लाडु व केळी वाटप करण्यात आले.

सदर सत्र हे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अश्विनी भारत, डॉ.विजया खेरा,डॉ.जयश्री वाडे, डॉ.अर्वा लाहेरी,डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.शरयू गावंडे,डॉ.नेहा वैद्य, डॉ. घोषणा कोराम,डॉ.उत्कर्षा कारमोरे तसेच आरोग्य सेविका, आशा वर्कर यांच्या सहकार्याने पार पडले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25

Sat Mar 22 , 2025
– अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन गडचिरोली :- अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर ‍शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!