हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये मतदारांना विशेष सूट देण्याचे मनपा आयुक्त डॉ. चौधरींचे आवाहन

– आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतली हॉटेल असोसिएशन पदाधिकऱ्यांची बैठक

नागपूर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरातील मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी, हॉटेल, रेस्टॉरेंट चालकांनी मतदानाच्या दिवसापासून तीन दिवस आपल्या आस्थापनांमध्ये मतदाराला विशेष सूट द्यावी असे आवाहन नागपूर महानगरपलिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात शुक्रवारी (ता: २५) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत नागपूर शहरातील हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, हॉटेल असोसिएशनचे तेजेंदर सिंग रेणू, ऋषी तुली,अजय जैस्वाल, तरुण मोटवानी, मनोज अवचट, वासूदेव त्रिवेदी, विशाल जैस्वाल, नितीन त्रिवेदी, विनोद जोशी, विजय चौरसिया, हरमनजीत सिंग बावेजा, इंद्रजीत सिंग बावेजा प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी पासूनच हॉटेल, रेस्टॉरेंट चालकांना स्वीपच्या माध्यमातून आपल्या आस्थापनेवर येणाऱ्या मतदारांना मतदानाविषयी जागृत करावे, मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, त्याकरिता आपल्या आस्थापनेवर दर्शनीय ठिकाणी जनजागृती फलक लावावेत, तसेच हॉटेल, रेस्टॉरेंट चालकांनी मतदानाच्या दिवसापासून तीन दिवस आपल्या आस्थापनांमध्ये मतदाराला विशेष सूट द्यावी असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले. यावेळी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत आवश्यक जनजागृती करण्याची ग्वाही दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फडणवीस ने चुनावी हलफनामे में घोषित की संपत्ति, 13.27 करोड़ की चल-अचल संपत्ति के हैं मालिक 

Sat Oct 26 , 2024
नागपुर :- महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ने 20 नवंबर को होने वाले विधानसभा चुनाव के लिए शुक्रवार को नागपुर दक्षिण पश्चिम सीट से अपना नामांकन पत्र दाखिल किया। इसके साथ ही नामांकन पत्र के साथ दाखिल हलफनामे में उन्होंने 13,27,47,728 रुपये की चल एवं अचल संपत्ति घोषित की। उनके टैक्स रिटर्न फॉर्म के अनुसार 2023-24 में उनकी कुल आय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com