नागपूर : म. न. पा. प्रवर्तन विभागा मार्फत दिनांक. २१/०२/२०२३ रोजी धरमपेठ झोन क्र. 2 अंतर्गत महाराजबाग परिसरातील टेडी बियर वाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. त्या नंतर झाशी राणी चौक ते मुंजे चौक ते व्हेरायटी चौक ते परत महाराजबाग रोड लता मंगेशकर दवाखाना समोरील परिसर पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली, ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे ४२ अतिक्रमण हटविले, तसेच परिसर मोकळे करण्यात आले.आशी नगर झोन क्र. 9 अंतर्गत ईटा भट्टी चौक येथील वनदेवी नगर नाल्या काठावरील अवैध पद्धतीने बांधण्यात आलेले फुटपाथ वरचे अंदाजे 27 अस्थाई घर तोडण्यात आले. कारवाई दरम्यान अतिक्रमणकारी यांच्या द्वारे प्रचंड विरोध करण्यात आला पोलीस विभागाद्वारे पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिल्यामुळे कारवाई तणावाचा स्थिती मध्ये पूर्ण करण्यात आली. तसेच कारवाई मध्ये यशोधरा नगर पोलीस स्टेशन चे वरिष्ट पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण आपल्या अधिनिस्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्या सह स्वतः उपस्थित होते.
गांधीबाग झोन क्र. 6 अंतर्गत राजविलास टाकीज समोरील दुकान नं. 3/4/21/25/27/29 येथे अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली, ज्या मध्ये दुकानाचे ग्रील व शेटर काढण्यात आले. त्या नंतर अवैध पद्धतीने बांधलेले पुस्तकाचे 3 दुकान व चहा/नाश्ता चे 2 दुकान तोडण्यात आले.
ही कारवाई अशोक पाटील उपायुक्त अतिक्रमण, गणेश राठोड, सहा.आयुक्त गांधीबाग झोन हरिष राऊत, सहा. आयुक्त आशी नगर झोन व संजय कांबळे प्रवर्तन अधिक्षक यांचे मार्गदर्शनात सुनील सरपाटे, भास्कर माळवे, विनोद कोकार्डे, विनोद डोंगरे, बाबाराव श्रीखंडे क. अभियंता व अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली.