अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर मनपाची कारवाई

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर कारवाई करण्यात आली असुन अनधिकृत रीतीने उभी करण्यात आलेली सुरक्षा भिंत तसेच सौंदर्यीकरण तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.

जगन्नाथ बाबा नगर, मातोश्री लॉनजवळील मौजा गोविंदपुर रीठ सर्वे नंबर १०० असलेल्या भूखंडावर अनधिकृत ले आउट टाकुन प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला असल्याचे मनपा पथकास पाहणीदरम्यान आढळले. सदर भूखंड हा ब्लू लाईन मध्ये असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही. यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५२अन्वये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास नोटीस देण्यात आली होती. मात्र विहीत मुदतीत अतिक्रमण न हटविल्याने सदर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ले आऊटवर मार्कींग करण्यात आली होती तसेच तसेच तात्पुरते टिनाचे शेड व त्यावर लावलेली नावाची पाटी व सिमेंटचे ओटे तोडण्यात आले आहेत.             चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की केवळ नोटरीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्रीची कारवाई करू नये भविष्यात यासंबंधी कुठल्याही संशय उद्भवल्यास याची जबाबदारी पुर्णपणे विक्री करून देणार व विक्री करून घेणार यांची राहील. दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी होत असलेल्या भूखंडाचीच खरेदी अथवा विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार तसेच अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली. शहरात जिथेही अनधिकृत ले आऊट आहेत तिथे कारवाई सुरु राहणार असल्याने अनधिकृत ले आऊट वर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांना शहरातील अनधिकृत ले आउट संबंधी माहिती असल्यास ती मनपास देण्याचे आवाहन मनपामार्फत करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इन्फ्लुएंझा मृत्यू विश्लेषण समितीने घेतला परिस्थितीचा आढावा

Sat Oct 28 , 2023
नागपूर :- इन्फ्लुएंझा मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) शुक्रवारी (ता. २७) नागपूर शहरात इन्फ्लुएंझा मुळे झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात पार पडलेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, सहाय्यक संचालक (वैद्यकीय) आरोग्य सेवा डॉ. प्रमोद गवई, सदस्य), मेयो रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या सहायक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com