नायलॉन मांजा, प्लास्टिक पतंगच्या विरोधात मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.9) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच नायलॉन मांजाच्या विरोधात 98 आस्थापनेची तपासणी करण्यात आली. धंतोली झोन अंतर्गत इंदिरानगर येथील पतंग दुकानातुन 20 प्लास्टिक पतंगे जप्त करुन 1000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत टिमकी, मोमीनपुरा येथील गणपती सोनपापडी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग न.13, अभ्यंकर नगर येथील M/s Green Serenity यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न.35, श्रीनगर येथील नारायणी इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच बस स्टँन्ड जवळ, राहुल कॉम्प्लेक्स, गणेशपेठ येथील M/s Enhance Coaching Classes यांच्याविरुध्द परवानगिशीवाय विद्युत खांबावर बॅनर आणि होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत प्रभाग न.02, पॉवर ग्रीड चौक येथील M/s SIP Abacus यांच्याविरुध्द परवानगिशीवाय विद्युत खांबावर बॅनर आणि होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुर्ला में अंगारकी संकष्टी चतुर्थी मनाई गई 

Tue Jan 10 , 2023
कुर्ला :-अंगारकी संकष्टी चतुर्थी के अवसर पर कुर्ला स्थित प्रसिद्ध श्री जागृत विनायक मंदिर में भगवान गणराय के दर्शन के लिए श्रद्धालुओं की भीड़ उमड़ पड़ी. सुबह पांच बजे से ही श्रद्धालुओं ने मंदिर में दर्शन करना शुरू कर दिया। इस मौके पर स्थानीय विधायक मंगेश कुडालकर, आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली, प्रवीना मोरजकर, मनीष मोरजकर, रियाज मुल्ला ने दर्शन का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!