मुंबई शेअर बाजारातही आता मराठी टक्का वाढता – उद्योग मंत्री सुभाष देसाई

  मुंबई  : राज्यातील मराठी उद्योजकांची कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड)  होत असल्याचा राज्याला अभिमान असून मुंबई शेअर बाजारातही आता मराठी टक्का वाढत असल्याचे उद्गार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

            सुप्रिया लाइफसायंन्स लिमिटेड या कंपनीचा लिस्टिंग समारंभ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे झाला. यावेळी कंपनीचे सीएमडी सतीश वाघबीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहानविविध क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री श्री. देसाई बोलत होते.

            आयपीओमधील उज्ज्वल यशाबदल अभिनंदन करुन उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले,  सुप्रिया लाइफसायंन्स लिमिटेडचा प्रवास हा अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारा आहे. ही मराठी माणसाची कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्याचा राज्याला अभिमान आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील सक्रिय औषध घटक निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या या मराठी बांधवांच्या कंपनीवर गुंतवणूकदारांनी पुन्हा विश्वास दाखवला याबद्दल आनंद आहे. देशात सूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचा मोठा गट असून त्यांच्या वाढीसाठी मुंबई शेअर बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारणे सहज झाल्याने या लहान उद्योजकांना त्यांचे लक्ष्य गाठणे शक्य झाले आहेअसे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

            सूचीबद्ध (Listing) कार्यक्रमांच्या माध्यमातून सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) उपलब्ध्‍ा करून दिलेल्या व्यासपीठाचा  नक्कीच उपयोग होईल. या व्यासपीठाच्या माध्यमातून सूक्ष्ममध्यम उद्योगांना थेट भांडवली बाजारामध्ये प्रवेश करता येणार असून त्यांना भांडवलासाठी अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. परिणामी या उद्योगांवर गुंतवणूकदारांचाही विश्वास वाढत आहे. त्यामुळे सूक्ष्म आणि मध्यम उद्योग करणाऱ्या मराठी उद्योजकांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध्‍ा झाले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून उद्योगांच्या समृद्धीसाठी समर्थन दर्शविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचेही (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावे - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Wed Dec 29 , 2021
मुंबई : राज्यात कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.             अकोला येथील महामार्गाजवळ क्रमांक सहावर एका खासगी कंत्राटदाराकडून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्या डांबरीकरणाच्या प्लाँटमध्ये 21 नोव्हेंबर रोजी स्फोट होऊन झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी लक्षवेधी सूचना सदस्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!