नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील व्हॉलिबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी संघांना नमवून समर्थ व्यायामशाळा आणि अजिंक्य क्लब कोंढाळी संघाने १८ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत धडक दिली.
प्रतापनगर येथील समर्थ व्यायामशाळा येथे सुरू असलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत समर्थ व्यायामशाळा संघाने आनंद नगर स्पोर्ट्स असोसिएशनचा २५-२३, २५-२३ ने पराभव केला तर दुस-या उपांत्य सामन्यात अजिंक्य क्लब कोंढाळी संघाने काटोल येथील युथ स्पोर्टींग क्लबला २५-१४, २५-१४ने पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीतील आव्हान स्वीकारले.
१८ वर्षाखालील मुलींच्या पहिल्या उपांत्य फेरीत कळमेश्वर येथील उडाण क्लब संघाने चुरशीच्या लढतीत विनस स्पोर्ट्स असोसिएशन संघाचा २५-९, २०-२५, १५-४ ने पराभव करून अंतिम फेरीत स्थान पक्के केले.
बुधवारी (ता.१८) प्रतापनगर येथील समर्थ व्यायामशाळा येथे स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी छत्रपती पुरस्कार विजेते प्रकाश पाठक, विवेक देशपांडे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, स्पर्धेचे कन्वेनर डॉ. पद्माकर चारमोडे, नागपूर जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे सुनील हांडे, माजी नगरसेवक गोपाल बोहरे, प्रमोद तभाने, किशोर वानखेडे, माजी नगरसेविका सोनाली कडू, नितीन कानोडे, संजय देशपांडे, सौरभ रोकडे आदींची उपस्थिती होती.सीनिअर पुरूष व महिला आणि १८ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात ही स्पर्धा सुरू आहे.
उपांत्य फेरी निकाल
१८ वर्षाखालील मुले
१. समर्थ व्यायामशाळा मात आनंद नगर स्पोर्ट्स असोसिएशन (२५-२३, २५-२३)
२. अजिंक्य क्लब कोंढाळी मात युथ स्पोर्टिंग क्लब (२५-१४, २५-१४)
१८ वर्षाखालील मुली
१. उडाण क्लब कळमेश्वर मात विनस स्पोर्ट्स असोसिएशन (२५-९, २०-२५, १५-४)