खासदार क्रीडा महोत्सव
कबड्डी
विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेत महिला गटात रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड आणि मराठा लॉनर्स नागपूर तर पुरूष गटात एकलव्य क्रीडा मंडळ आणि ओम अमर क्रीडा मंडळ नागपूर संघाने अंतिम फेरीत धडक दिली.
महिलांच्या उपांत्य फेरीत रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड संघाचा सामना संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर संघाशी झाला. या सामन्यात रवींद्र संघाने २७-४ अशा गुणासह म्हणजे २३ गुणांनी सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुस-या उपांत्य सामन्यात मराठा लॉनर्स नागपूर (३८) संघाने साई स्पोर्टिंग काटोल संघाचा (३२) ६ गुणांनी पराभव करीत रवींद्र संघाचे अंतिम फेरीतील आव्हान स्वीकारले.
पुरूष गटातील उपांत्य फेरीत एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर संघाने (३८) शक्ती जीम क्रीड मंडळ संघाचा (२३) १५ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. दुस-या उपांत्य फेरीतील सामन्यात ओम अमर नागपूर संघाने (४२) भिवादेवी क्रीडा मंडळ भिवापूर संघाचा (३६) ६ गुणांनी पराभव करील एकलव्य संघाचे आव्हान स्वीकारले.