नागपूर :– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवातील मलखांब स्पर्धेत श्री महालक्ष्मी नगर येथील शौर्य स्पोर्टस अकादमीच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके प्राप्त करीत सांघिक विजेतेपद पटकाविले. विरांगण स्पोर्ट्सच्या निनाद दीक्षित आणि संजना मारोडे या दोन्ही खेळाडूंनी वैयक्तिक सर्वाधिक पदकांची कमाई केली. सांघिक विजेत्या शौर्य क्लबने प्रदीप केचे यांच्या मार्गदर्शनात यश प्राप्त केले.
नागपूर शहराचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी मलखांब संघटनेचे प्रदीप केचे, राजाभाउ अधिकारी, कन्वेनर संदेश खरे, समन्वयक स्वाती आखतरकर, सर्वेश बावनकर आदी उपस्थित होते.
निकाल
सांघिक विजेते – मुले
प्रथम – विरांगण स्पोर्टिंग क्लब
द्वितीय – शौर्य स्पोर्टिंग क्लब आणि रॉयल स्पोर्टिंग क्लब
मुली
प्रथम – शौर्य स्पोर्टिंग क्लब
द्वितीय – केशवनगर माध्यमिक विद्यालय
वैयक्तिक विजेते – निनाद दीक्षित आणि संजना मारोडे (दोघेही विरांगण स्पोर्टिंग क्लब)
सांघिक विजेतेपद – शौर्य स्पोर्टिंग क्लब श्री महालक्ष्मी नगर
सविस्तर निकाल (प्रथम तीन विजेते)
१० वर्षाखालील – मुले
शक्ती गौर, हार्दिक लांजेवार (दोघेही शौर्य स्पोर्टिंग क्लब) व निरज उमरेडकर (केशवनगर माध्यमिक विद्यालय)
मुली –
शिवश्री बांगरे (रॉयल स्पोर्टिंग क्लब), आरोही गजभिये व अवनी काटकर (दोघी शौर्य स्पोर्टिंग क्लब)
१४ वर्षाखालील – मुले
तेजस सेलोकर (रॉयल स्पोर्टिंग क्लब), अथर्व बढीये (शौर्य स्पोर्टिंग क्लब), हर्ष कांबळी (रॉयल स्पोर्टिंग क्लब)
मुली – अदम्या पाचखेडे (शौर्य स्पोर्टिंग क्लब), समिक्षा कावळे (केशवनगर), शाल्मली सुर्जीकर (विरांगण स्पोर्टिंग क्लब)
१२ वर्षाखालील – मुले
वेदांत सुर्यवंशी (विरांगण स्पोर्टिंग क्लब), यास्मीन मिश्रा (रॉयल स्पोर्टिंग क्लब), समी दिघोरे (नूतन भारत)
मुली –
आराध्या येडे (शौर्य स्पोर्टिंग क्लब), नारायणी दीक्षित (विरांगण स्पोर्टिंग क्लब) व रियाना खुराना (रॉयल स्पोर्टिंग क्लब)
१६ वर्षाखालील – मुली
समृद्धी बांगरे, संस्कृती गाढवे व आदिती बावनकर (तिघीही केशवनगर)
१६ वर्षावरील मुली
संजना मोराडे (विरांगण स्पोर्टिंग क्लब), शिवानी डुबले (रॉयल स्पोर्टिंग क्लब), भक्ती जोशी (विरांगण स्पोर्टिंग क्लब)
१८ वर्षाखालील – मुले
प्रेम शाहु (केशवनगर), पार्थ लकडे (रॉयल स्पोर्टिंग क्लब), हिमांशू भारद्वाज (शौर्य स्पोर्टिंग क्लब)
१८ वर्षावरील मुले
निनाद दीक्षित, हिमांशू अतकरे, रोपेंद्र हरीणखेडे (तिघेही विरांगण स्पोर्टिंग क्लब)