दपूम रेल्वे मैदान मोतिबाग
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवातील फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी संघांना नमवून मुलींच्या गटात सेंट उर्सुला आणि अम्मा फुटबॉल क्लब संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
गुरूवारी स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी सुधीर दिवे, नवनीत सिंग तुली, हरेश व्होरा, इकबाल कश्मीरी, दीपक अरोरा, राजू बाहवरा, बसंत तिवारी, भोलानाथ सहारे, गणेश कानफाडे, अविनाश धामगाये आदींची प्रमुख उपस्थिती होती.
निकाल – मुली – उपांत्यपूर्व फेरी
१. सेंट उर्सुला मात एफ.एफ.सी. चनकापूर (१-०)
धनश्री शेरकुरे ९वे मिनिट
२. अम्मा फुटबॉल क्लब मात ऑरेंज सिटी अकादमी (४-०)
निर्मला धुर्वे १० आणि ३३वे मिनिट
रिंकी यादव २९ आणि ४५वे मिनिट
पुरूष
१. अंसार स्पोर्टिंग क्लब मात रब्बानी क्लब (२-१)
सौरभ अख्तर ८८वे मिनिट
मो. रिझवान ९०+३ मिनिट
रब्बानी – हसन ९०+० मिनिट
अनास अख्तर ४०, मो. रिझवान ६०व्या मिनिटाला ताकीद
सामनावीर – अनास अख्तर
बेस्ट प्लेअर – हसन
२. यंग मुस्लीम मात नागपूर ब्ल्यू (४-१)
फहाद जुनैद ५वे, उमर सय्यद ४०, ६३ आणि ७० वे मि.
नागपूर ब्ल्यू – शहजाद खान २७वे मि.
यश शुक्ला ३१, मो. उझैफ ४६व्या मिनिटाला ताकीद
ब्ल्यू – शहजाद खान ६७ वे मिनिटाला ताकीद
सामनावीर – उमर सय्यद
बेस्ट प्लेअर शहाजाद खान