खासदार कृपाल तुमाने यांनी क्षणात सोडविल्या नागरीकांच्या समस्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

वाडी :- येथिल लाईफस्टाईल सोसायटी आणि लेक व्यू अपार्टमेंटच्या नागरिकांच्या अनेक महिन्यांपासुनच्या प्रलंबित समस्या खासदार कृपाल तुमाने यांनी अवघ्या काही मिनिटात सोडवल्या रविवार दिनांक ३० जुलै ला खासदार तुमाने यांनी नागरिकाच्या आग्रहास्त वाडी येथिल लाईफस्टाईल सोसायटी मध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी लाईफस्टाईल सह लेक व्यु सोसायटी आणि वाडी मधिल नागरिकांशी चर्चा केली. यावेळी नागरिकांनी त्यांना परिसरातून वाहणा-या खुल्या नाल्यामुळे होणा-या दुर्गंधीचा त्रास तसेच नाल्यामधील धान सांडपाणी जमिनित पाझरून ठिकठिकाणी होणा-या चिखलाच्या समस्याबद्दल सांगितले. खासदार तुमाने यांनी लगेच वाडी नगर परिषदेचे मुख्यधिकारी विजय देशमुख यांना बोलावून घेतले. मुख्याधिकारी देशमुख यानी वाडी मधिल अनेक किलोमीटर लांबीच्या नाल्यामध्ये दुरुस्ती आणि संरक्षण भिंत बांधण्यासाठी १३४ कोटी रुपयाचा निधी आधीच खासदार तुमाने यांच्या प्रयत्नाने मंजुर झाला असुन लवकरच त्या संदर्भात काम सुरु होणार असल्याची माहीती दिली नागरिकांनी परिसरात सिवर लाईन नसल्यामुळे होणारा त्रास तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दलही खासदारांना माहिती दिली खासदार तुमाने यानी यावेळी पावसाळ्यानंतर लगेच वाडी मध्ये सीवर लाईन टाकण्यासाठी चे काम सुरु होणार असुन त्यासाठीचा मास्टर प्लॉन आधिच तयार असल्याची माहिती दिली. तसेच लकी चिकन सेंटर पासुन ऍटोमिक एनर्जी डेपो रोड पर्यंत सिमेंट रस्त्याचे कामही पावसाळ्या नंतर सुरु होईल अशी माहिती दिली यावेळी लाईफस्टाईल सोसायटी चे अनंत फाटे, प्रताप तंतुवे, राजेश दाऊ, सत्यप्रकाश निकोसे, अशोक पुरकर, कमल गोयल, प्रफुल लिचडे, तर लेक व्यु अपार्टमेटचे गोयल शिवसेना जि. नागपुर ग्रामिण अध्यक्ष संदिप ईटकलवार जिल्हा प्रमुख अमोल गुजर युवा सेना शुभम नवले हे नागरिक उपस्थित होते खासदार कृपाल तुमाने यांनी अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या आणि वारंवार सरकारी कार्यालयाचे खेटे घालूनी ही न सुटना या समस्या संबंधित अधिका-याला बोलावून सोडवल्यामुळे आणि काही क्षणात नागरीकांचे समाधान केल्यामुळे लाईफस्टाईल सोसायटी लेक व्यु अपार्टमेंट आणि परिसरातील नागरिकांनी खासदार तुमाने यांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांचा भाजपामध्ये प्रवेश

Thu Aug 3 , 2023
– नाशिक, रायगड, जिल्ह्यातील अनेक पक्षांचे कार्यकर्तेही भाजपामध्ये मुंबई :- नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार दिलीप बोरसे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!