मौदा :- दिनांक २९/०३/२०२४ चे रात्री ००.१५ वा. दरम्यान मौदा पोलीस स्टेशन येथील DB पथक पोस्टे परिसरात चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना मौजा महालगाव शिवारात NH-53 भंडारा नागपूर महामार्गावर नाग नदीच्या पुलाजवळ मारोती आर्टिगा कार क्र. MP-13/CD-1017 ही संशयस्पद स्थितीत रोडच्या कडेला उभी असल्याचे दिसल्याने पोलीस स्टाफ सदर कारला तपासण्या करिता गेले असता कार मधील ५ संशयित इसम कार मधून पळून गेले, मोठ्या शीताफिने पाठलाग करून आरोपी नामे १) सुनील प्रमोद श्रीवास्तव वय ३८ वर्ष इंदोर २) आमजद सिराज खान वय ३८ वर्ष राहणार उज्जैन ३) गोविंद पेरूलाल मालवी वय ३१ वर्ष साजापूर ४) नानू राम कुशीलाल जाधव वय ३७ वर्ष राहणार राजापूर ५. बिहारीलाल थाबरजी मालवी वय ४५ वर्ष साजापूर (मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेऊन आरोपीतांची व कारची झडती घेतली असता त्यांचेकडे दोन लाकडी काठ्या, मोठी लोखंडी तलवार, लोखंडी कोयता, लोखंडी चाकु, नायलॉन दोर, मिरची पावडर, लोखंडी कटोनी व ५ मोबाईल फोन असा एकूण ५,३९,१५०/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपी नागपूर भंडारा महामागीवरील प्रवासी व व्यापाऱ्यांवर दरोडा टाकून लुटण्यासाठी दरोड्याच्या तयारीत असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध फिर्यादी संदीप कडू पोलीस हेड कॉन्स्टेबल नेमणूक मौदा पोलीस स्टेशन यांचे फियदि वरून गु. रजि. नं. कलम ३८०/२०२४ भादवि सहकलम ३९९, ४०२ सहकलम भारतीय हत्यार अधिनियम ४,२५ सहकलम १३५ म.पो.अ चा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश वामन बोथले पोस्टे मौदा हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, उपविभागीय पो. अधिकारी कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार व. पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, पो.उपनि महेश बोधले, पो.हवा. संदीप कडु, पो.हवा. गणेश मुदमाळी, पो. हवा. रुपेश महादुले, पो.ना. दिपक दरोडे, पो.अ शुभम ईश्वरकर पो.अं अतिश गाढवे यांनी केलेली आहे