मौदा :- अंतर्गत मौजा सावळी फाटा येथे दि. २३/०६/२०२४ मे १८/०० वा. ते १८/१५ वा. दरम्यान आरोपी नामे- १) रूपेश महेश यादव वय २० वर्ष रा. भांडेवाडी डम्पींग यार्ड जवळ नागपूर २) विधीसंघर्ष बालक यांनी संगनमत करून फिर्यादी नामे राजेश विनायक रामटेके, वय ३३ वर्ष, रा. सावळी ता. कामठी जिल्हा नागपूर याच्या भावा जवळील रेडमी कंपनीचा मोवाईल हिसकावून घेवुन पळून जात असता यातील फिर्यादीने त्याला अडवत असता यातील आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी खुटीने मारून जखमी केले व त्या ठिकाणा वरून मोबाईल घेवुन पळुन गेला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून आरोपीविरूद्ध पोस्टे मौदा येथे कलम ३९४, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपी क्र. ०१ यास मौदा पोलीसांनी अटक केली आहे.
सदरची कार्यवाही हर्ष पोद्दार (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मौदा येथील ठाणेदार सतिशसिंग राजपूत यांचे नेतृत्वात त्यांचा स्टाफ यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि मनोज चौधरी हे करीत आहे.