मौदा :-पोलीस स्टेशन मौदा हहित पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, कुंभापुर शिवारातील कन्हान नदीचे पात्रात काही ट्रॅक्टर चालकांनी आप-आपले ट्रॅक्टर अवैद्यरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुकी करीता नेलेले आहे. यावरुन त्वरीत पोलीस स्टेशन मौदा येथील अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एक स्वराज कंपनीचे विना नंबरचे ट्रॅक्टर चे ट्रॉली मध्ये रेती दिसुन आली. सदरहु ट्रॅक्टर चालक आरोपी नामे महेश ज्ञानदेव बावने, वय २३ वर्षे, रा. बोरी सिंगोरी, ता. पारशिवनी, जि. नागपुर यास त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर मधील रेती बाबत विचारले असता ट्रॅक्टर मालक राम नाकाडे रा. बोरी सिंगोरी याचे सांगणे वरुन रेतीची चोरटी वाहतुक करीत असल्याचे सांगीतल्याने सदरहू ट्रक्टर चालक व मालका विरुद्ध कलम ३०३(२), ४९ भा.न्या.स. सहकलम. ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीण महसुल अधिनियम सहकलम ४.२१ खाण आणि खनिजे अधिनियम सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
त्यानंतर त्वरीत पोलीस स्टेशन मौदा येथील अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार हे कुंभापुर शिवारातील कन्हान नदीचे पात्रात गेले असता कन्हान नदीचे पात्रातील दोन स्वराज कंपनीचे विना नंबरचे ट्रॅक्टर चे चालक त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर पात्रात सोडुन पसार झाले. यावरुन पसार झालेल्या ट्रॅक्टर चालका विरुद्ध ३०३(२) भा.न्या.स. सहकलम. ४८(७), ४८ (८) महाराष्ट्र जमीण महसुल अधिनियम सहकलम ४, २१ खाण आणि खनिजे अधिनियम सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम अन्वये वेगळा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरहू कार्यवाही मध्ये तिन स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर ट्राली सह किंमती २४,००,०००/-रु. व अंदाजे ३ ब्रास रेती कि. १५,०००/-रु. असा एकुन २४,१५,०००/-रु. चा माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, रमेश धुमाळ, अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, संतोष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्हान, यांचे मार्गदर्शणात प्रमोद घोंगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन मौदा यांचे सोवत पोलीस स्टॉप पोउपनि महेश बोधले, पोहवा संदीप कडु, गणेश मुदमाळी, रुपेश महादुले, पोना दिपक दरोडे यांनी केली आहे.