महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेबरोबर सामंजस्य करार

मुंबई  :- आशियाई विकास बॅंक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांची सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून निवड करण्यात आलेली आहे. याबाबतचा सामंजस्य करार 23 जुलै 2024 रोजी नागपूर येथे करण्यात आला आहे.

मॅग्नेट प्रकल्पाच्यावतीने प्रकल्प संचालक विनायक कोकरे आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूच्यावतीने संचालक डॉ. दिलीप घोष यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मॅग्नेट प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, नागपूर प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे विभागीय उपप्रकल्प संचालक अजय कडू आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूरचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.

मॅग्नेट प्रकल्पात घटक-1 अंतर्गत विविध शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम व विस्तार विषयक कर्यक्रम राबविण्यात येतात. यामध्ये प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (Training of Trainers), शेतकरी उत्पादक संस्थांची संस्थात्मक बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम (BoD), उत्तम कृषी पद्धती (GAP), काढणीपश्चात व्यवस्थापन(PHM) इ. प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे. या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी पायाभुत सुविधा उपलब्ध असतील, अशा संस्थाची Centre of Excellence (CoE) म्हणून निवड करण्यात येते. मॅग्नेट संस्थेचे अध्यक्ष तथा अपर मुख्य सचिव (सहकार व पणन), महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यतेने मॅग्नेट प्रकल्पामध्ये Centre of Excellence (CoE) म्हणून IIM, नागपूर, राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र, सोलापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे व राज्यातील प्रमुख कृषी विज्ञान केंद्रे, यांसारख्या संस्थांची निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर ही लिंबूवर्गीय फळ पिकांसाठी कामकाज करणारी देशपातळीवरील एक महत्वाची संस्था आहे. या संस्थेमध्ये लिंबूवर्गीय फळांच्या नवीन वाणांचा विकास, गुणवत्तापूर्ण उत्पादन, विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित करणे, विस्तार विषयक कार्य, काढणी पश्चात व्यवस्थापन, मूल्यवर्धन इ. बाबत विविध उपक्रम राबविण्यात येतात. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांची सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून निवड झाल्यामुळे मॅग्नेट प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या संत्रा, मोसंबी आणि लिंबू या पिकांमध्ये कामकाज करणा-या शेतक-यांना व शेतकरी उत्पादक संस्थांना याचा विशेष लाभ होणार आहे. मॅग्नेट संस्थेचे अध्यक्ष तथा अपर मुख्य सचिव (सहकार व पणन), अनूप कुमार यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा करार झाल्याचे प्रकल्प संचालक कोकरे यांनी सांगितले.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूरचे संचालक डॉ. घोष यांनी आम्ही मॅग्नेट प्रकल्पासोबत कामकाज करण्यास उत्सुक असून भविष्यात मॅग्नेट संस्थेच्या सहकार्याने लिंबूवर्गीय शेतक-यांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे नमूद केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वृक्षारोपण का दूरदर्शी अभियान ‘एक पेड़ माँ के नाम’ का शुभारंभ

Fri Jul 26 , 2024
– वेकोलि में 97 स्थानों पर 78000 फलदार एवं औषधीय पौधों का रोपण तथा वितरण किया जाएगा नागपुर :- केंद्रीय कोयला एवं ख़ान मंत्री जी. किशन रेड्डी ने आज दिनांक 25 जुलाई 2024 को बी.सी.सी.एल, धनबाद में दूरदर्शी अभियान ‘एक पेड़ माँ के नाम’ के तहत वृक्षारोपण अभियान-2024 का शुभारंभ किया। इस अवसर पर कोयला मंत्रालय, भारत सरकार के सचिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com