आरोपीतांचे ताब्यातुन एकुण 06 दुचाकी वाहन जप्त करुन एकुण 3,50,000/रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे..
नागपुर – पोलीस स्टेशन वाठोडा येथे फिर्यादी प्रशांत सुरेश जांगडे, वय 22 वर्ष गोविंदप्रभु नगर, वाठोडा नागपूर यांनी आपल्या मालकीचा दुचाकी वाहन, आपल्या राहात्या घरासमोर लॉक लावुन ठेवली होती. त्यानंतर फिर्यादी यांना काही कामानिमित्त बाहेर जाणे असल्याने, त्यांनी मोटार सायकलची पाहाणी केली असता मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी मिळुन आली नाही. करिता फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन वाठोडा नागपूर शहर येथे अज्ञात आरोपी विरुध्द 177/2022 कलम 379 भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नागपूर शहर हद्दितुन दुचाकी वाहनांची चोरीचे प्रमाणे वाढल्याने, गुन्हे प्रकटीकरण पथक क्रमांक 02, येथे कार्यरत अधिकारी व अमंलदार यांनी परिसरातील गुप्तबात्मीदारांकडुन प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे वरिल नमुद आरोपी इसमांचे राहात्याघरी तपासणी केली असता 01) रवी प्रकाश श्यामसिंग रहांगडाले वय 27 वर्ष रा. प्लॉट नं. 207 द्वारका नगर पोलीस स्टेशन कामठी नागपूर शहर. 02) ओमप्रकाश श्यामसिंग रहांगडाले वय 25 वर्ष रा. आराधना नगर, पोलीस स्टेश न वाठोडा नागपूर शहर,या आरोपींकडून 1) गोल्डन रंगाची होंडा लिओ मोटार सायकल क्रमांक MH-49-AG-0441 कि.अं. 50,000/- रू. नमुद गाडी बाबत पो.स्टे. वाठोडा येथे अप.क्र 177/2022 कलम 379 भादवि चे गुन्हा दाखल आहे 2) काळया निळया रंगाची स्पलेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक MH-40-AA-7621 कि.अं. 40,000/- रू. नमुद वाहना बाबत पो.स्टे. अजनी येथे अप.क्र 79/2022 कलम 379 भादवि चा गुन्हा दाखल आहे. 3)काळया रंगाची ड्रिम न्युओ मोटार सायकल क्रमांक MH-31-W-0168 कि.अं. 70,000/- रू. नमुद गाडी बाबत पो.स्टे. हुडकेश्वर येथे अप.क्र 174/2022 कलम 379 भादवि चे गुन्हा दाखल आहे 4)निळया काळया रंगाची स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल क्रमांक MH-31-DW-1479 कि.अं. 45,000/- रू. नमुद गाडी बाबत पो.स्टे. वाठोडा येथे अप.क्र 129/2022 कलम 379 भादवि चे गुन्हा दाखल आहे. 5)काळया रंगाची स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल क्रमांक MH-49-K-1286 कि.अं. 45,000/- रू. नमुद गाडी बाबत पो.स्टे. वाठोडा येथे अप क्र. 210/2022 कलम 379 भादवि चे गुन्हा दाखल आहे 6) लाल रंगाची पैशन प्लस मोटार सायकल क्रमांक MH-49-KR-0276 कि.अं. 50,000/- रू. नमुद गाडी बाबत पो.स्टे. कळमना येथे अप.क्र 170/2022 कलम 379 भादवि चे गुन्हा दाखल आहे 7) स्प्लेन्डर मोटार सायकल क्रमांक MH-40-BM-6350 किमती 50,000/-रु. एकूण 07 वाहन चोरीचे गुन्हे उघडकिस आणून त्यांचे ताब्यातून 06 मोटारसायकली हस्तगत केल्या.
सदर आरोपी इसमांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली असतांना आरोपीतांनी माहिती दिली की, ते दोन्ही नात्याने सख्खे भाऊ असुन नागपूर शहर हद्दील विविध पोलीस स्टेशन, पो.स्टे. वाठोडा, कळमना, हुडकेश्वर , अजनी, अंर्तगत येणा-या परिसरातुन त्यांनी एकुण 07 दुचाकी वाहनांची चोरी केली व एक वाहन जिल्हा सिवनी राज्य मध्यप्रदेश येथे विक्री केल्याची माहिती दिली. करिता उपरोक्त नमुद आरोपीतांचे ताब्यातुन एकुण 06 दुचाकी वाहन जप्त करुन एकुण 3,50,000/रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस उप आयुक्त डिटेक्षन चिन्मय पंडीत, सहाîयक पोलीस आयुक्त रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सपोनि दिपक मस्के,पो.हवा. संतोश मदनकर, रामनरेश यादव,राजेश तिवारी, शेशराव राऊत, योगेश गुप्ता, किशोर ठाकरे, सचिन आंधळे, सुरेश बर्वे, सुनिल कुंवर, चापोशि मंगल जाधव, विवेक श्रीपाद, सर्व नेमणुक – गुन्हे प्रकटीकरण पथक क्रमांक 02, नागपुर शहर यांनी सदर कामगीरी बजावलेली आहे