ट्रकच्या अपघातात मोटरसायकल स्वाराचा मृत्यु..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

पारशिवनी – पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड शिवारात ट्रकच्या अपघातात मोटर सायकलस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज ( दि.19 ) दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली.

नयाकुंड शिवारात असलेल्या शेतीतून वातावरणातील पावसाचा अंदाज घेता घरी जाण्यासाठी मुलगा सुमीत अशोक अवस्थी व मृतक अशोक रामदयाल अवस्थी ( वय 58 ) रा.नयाकुंड ता.पारशिवनी जि.नागपूर निघाले असता , मोटरसायकल क्र.एम.एच.40 बी.जे.1982 वर बसताच क्षणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळश्याचा ट्रक क्र. एम.एच.40 बी.एल.2316 याने जबर धडक दिली.यात मुलगा सुमीत अवस्थी जख्मी झाला तर अशोक अवस्थी यांचा ट्रकखाली येऊन जागीच मृत्यु झाला. मात्र घटनास्थळावरून ट्रकचालक ट्रकसहित पळून गेला. या घटनेची माहिती नयाकुंड येथील नागरीकांना मिळताच त्यांनो घटनास्थळ गाठले. व लगेच पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतकाला आणले असता , डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

या घटनेचा तपास पारशिवनीचे पोलीस निरीक्षक राहुल सोनवाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनायक नागुलवार करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जी-२० परिषदेअंतर्गत नागपुरात उद्यापासून आयोजित होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी देश-विदेशातून आलेल्या प्रतिनिधींचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक नागपुरी पद्धतीने स्वागत करण्यात आले.

Sun Mar 19 , 2023
जी-२० परिषदेअंतर्गत नागपुरात उद्यापासून आयोजित होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी देश-विदेशातून आलेल्या प्रतिनिधींचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक नागपुरी पद्धतीने स्वागत करण्यात आले.  Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!