संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- व्यवसायिक इमारती, हॉटेल्स आदीं इमारतींना आग लागून संभाव्य नुकसान व जीवितहानी टाळण्यासाठी फायर ऑडिट अत्यंत महत्वाचे आहे मात्र कामठी तालुक्यातील बहुतेक इमारतीचे अजूनही फायर ऑडिट झाले नसून संबंधित नगर परिषद प्रशासन चे इमारतीच्याअ फायर ऑडिट कडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे तर तालुका प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे अशा इमारतींना भविष्यातील दुर्घटनेकरिता मोकळे रान झाल्याचे दिसून येत आहे.
कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात हजारो व्यवसायिक व मालमत्ताधारक आहेत याशिवाय सार्वजनिक व शासकीय कार्यालय देखील आहेत.या ठिकाणी नागरिकाची नेहमीच वर्दळ असते.महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 अंतर्गत व्यावसायिक मालमत्ताधारकानो त्यांच्या व्यावसायिक ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना पुरेशा प्रमाणात व वेळोवेळी प्रभाविरोत्या कार्यक्रम आहे का , याची खात्री करून घेणे आवश्यक आहे याकरिता दर सहा महिन्यातुन एकदा अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण करून घेणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे मात्र कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील बहुतांश व्यवसायिक मालमत्रधारकांनी अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण अजूनपावेतो करून घेतलेले नाहो त्यामुळे याबाबत नगर पालिकेसह तालुका प्रशासनाने आपल्या हद्दीतील सर्व व्यवसायिक मालमत्ताधारकांना त्याबाबत नोटीस देऊन ऑडिट करवून घेणे आवश्यक आहे.उन्हाळा तोंडावर असून आगीच्या घटना ह्या तोंडावरच असतात तरीदेखील नगर पालिका चे डोळे अजूनही उघडलेले नाही
व्यवसायिकानो वर्षातून दोनदा फार्म बी व वार्षिक ऑडिट करणे बंधनकारक आहे मात्र याबाबत व्यवसायिकांचे दुर्लक्ष दिसून येते त्यामुळे आगोसारख्या घटना घडल्यास बाहेरून अग्निशमन यंत्रणा मदतीसाठी येईपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविता येत नाहो यात अनेकदा मोठे नुकसान होते व अशा घटना घडल्याचे ऐतिहासिक घटना आहेत.
-कामठी शहर हे दाट वस्तीचे शहर असून व्यावसायिक मालमताधारक सुदधा दाटीने वसलेले आहेत मात्र शहरातील बऱ्याच व्यवसायिक मालमत्ताधारकांनी आपल्या व्यवसायिक ठिकानो अग्निसेवक यंत्रणा स्थापित केलेली नाहो त्यामुळे अशा इमारतधारकांनी लवकरात लवकर अग्निसेवक यंत्रणा बसवून घ्यावी तसेच ज्या इमारतींनी सक्षमता प्रमाणपत्र घेतले नसेल त्यांनी ते करून घ्यावे अशा सूचना नगरपालिकेने देणे गरजेचे आहे त्याचबरोबर आग प्रतिबंधक जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 अंतर्गत शासकीय कार्यालये, हॉटेल्स, लॉज , रेस्टरेंट , रुग्णालये, शैक्षणिक इमारत, बहुमजली शाळा व महाविद्यालय , व्यवसायिक इमारती,व सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविणे आणो दरवर्षी त्याचे फायर ऑडिट करणे आवश्यक आहे.अशा प्रकारची यंत्रणा बसविल्यानंतर दरवर्षी जानेवारी व जुलै अशा सहा महिन्यांनी नगर परिषद च्या अग्निशमन विभागाकडून ती यंत्रणा कार्यक्षम असल्याचा दाखला घेणे बंधनकारक आहे.