अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका नामवंत शाळेत शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला 28 वर्षीय एका नराधमाने प्रेमसंबंधाची फूस लावून शाळेसमोरून दुचाकीने रामटेकच्या खिंडसी कडे नेऊन विनयभंग केल्याची घटना 7 डिसेंबरला घडली असून यासंदर्भात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अनुप अण्णादास डोंगरे वय 28 वर्षे रा.जे पी नगर कामठी विरुद्ध भादवी कलम 354,363 सहकलम 8/12 बाल लैंगिक अत्याचार अधिनियम पोक्सो ऍक्ट अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित अल्पवयीन मुलीचे आई वडील हे 7 डिसेंबरला सकाळपासून बाहेरगावी गेले असल्याची माहिती आरोपीला कळताच आरोपीने योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचून सदर पीडित मुलीशी मोबाईल वर संपर्क साधून सकाळी 11 वाजता तिला शाळेसमोरून स्वतःच्या दुचाकीने बसवून प्रेमसंबंधाची फूस लावून खिंडसी कडे घेऊन गेला व तिच्याशी अश्लील चाळे करू लागला मात्र तिला भीती वाटताच तिने घरी सोडून मागल्याची विनवणी केल्यानुसार आरोपी व सदर पीडित मुलगी ही सायंकाळी चार पर्यंत घरी परतले मात्र याबाबतची कुणकुण पीडित मुलीच्या आईला कळताच तिच्या आईने आरोपीचे घर गाठून त्याचे मोबाईल तपासून मुलीच्या काही चित्रफिती आहेत का याबाबत मोबाईल ची तपासणी केली मात्र आक्षेपार्ह असे कुठलेही चित्रफिती दिसून न आल्याने त्यावर समाधान व्यक्त केले मात्र 14 वर्षीय मुलीला प्रेमसंबंधाचे खोटे आमिष देऊन तिची दिशाभूल करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी जुनी कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती भाजप कामठी कार्यालय येथे उत्साहात साजरी

Sat Dec 10 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती भाजप कामठी कार्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना सांगितले की संत संताजी जगनाडे महाराज आपल्या पारंपारिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागले आणि त्या काळी बाल विवाहाची परंपरा असल्यामुळे त्याचा वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!