नागपूर :- महावितरण चा वतीने नागपूर शहरात घरगुती वीज मीटर बदलवून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावण्याचे कार्य सुरू आहे.यामुळे आधीच महागाई ने होरपळलेल्या सर्वसाधारण जनतेला याचा नाहक त्रास होणार असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना,नागपूर शहर हा लोकांवरती होणारा अन्याय कदापी सहन करणार नाही तसेच स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर च्या माध्यमातुन ऊर्जा विभागाचे खाजगीकरण ही पण बाब गंभीर असुन याबाबतचे निवेदन मनसे नागपुर शहराचा वतीने शहर अध्यक्ष विशाल बडगे यांचा नेतृत्त्वात महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री अमीतजी परांजपे यांना देण्यात आले.सदर विषयाबाबत निषेध नोंदविण्यात आला.तरीही जर आपल्या विभागातर्फ़े यावर त्वरित निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे या वेळी सांगण्यात आले.
यावेळी नागपूर शहर अध्यक्ष विशाल बडगे, शहर सचिव घनःश्याम नीखाडे, शहर उपाध्यक्ष शशांक गिरडे, गौरव पूरी, तुषार गिऱ्हे, महेश जोशी, सचिन धोटे, अरुण तिवारी, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उतखेडे, विकास साखरे, राहुल , माहीला सेनेच्या शहर अध्यक्ष स्नेहा खोब्रागडे, उपशहर अध्यक्ष वैशाली गिरी, पूर्व विभाग अध्यक्षा नंदा खोब्रागडे, दक्षिण विभाग अध्यक्षा मिना राघोर्ते,