सामान्यांचा व्हॉईस दुबळा होऊ देऊ नका – ज्येष्ठ नेते शरद पवार

– चौथे सत्र : व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन

बारामती :– एकंदरीत आज देशातील माध्यमांशी स्थिती बदलली आहे. पत्रकाराला स्वतः चे मत मांडायला, भूमिका घ्यायला वाव कमी आहे, असे वातावरण आहे.

सत्य आणि योग्य असेल तर मांडा पण कुणाच्या सूचनेवरून भूमिका ठरवू नका.सामान्यांचा अपेक्षेचे ओझे पत्रकारितेवर आहे.हा जो “व्हॉईस” आहे तो दुबळा होऊ देऊ नका, असे आवाहन देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केले.

पत्रकारिता व साहित्याच्या माध्यमातून आपल्या लेखणी द्वारे आयुष्य झिजविणाऱ्या सारस्वतांचा व्हाॅईस ऑफ मीडियाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते.

ते म्हणाले की, पत्रकारांच्या अधिवेशनाला खूप वेळा उपस्थीत राहिलो आहे.

महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांशी घनिष्ठ संबंध होते. स्व.नीळकंठ खाडिलकर यांनी अनेक वेळा मुलाखती घेतल्या. राजनीती पहिले वर्तमानपत्र काढले. नेता , काॅंग्रेस पत्रिका, सकाळचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केल्याच्या गमतीदार आठवणी त्यांनी सांगितल्या.

सबंध देशाचे चित्र समोर ठेवले तर मोदींच्या नेतत्वातील भाजप शासित राज्य कमी आहेत.खासकरून केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, मध्ये भाजप नाही. गोवा मध्ये तोडफोड झाली, महाराष्ट्र मध्ये काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली.

देशातील जवळपास ५ टक्के राज्य भाजपच्या बाजूला नाहीत. देशाच्या पुढील स्थिती येत्या काळात बदलले असे चित्र आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रमाणे पत्रकारीतेची आज खरी गरज आहे.

सत्य मांडा, असत्यावर बोट ठेवा मात्र कुणाच्या तरी सांगण्यावरून काही मांडू नका, असेही ते म्हणाले.

देशापुढील सामाजिक परिस्थीती सुधारण्याचे आव्हान पत्रकारासमोर – सुशीलकुमार शिंदे..

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारितेची परंपरा मोठी असल्याचे सांगितले. छोट्या पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम व्हाईस ऑफ मीडियाने सुरू केले आहे ते कौतुकास्पद आहे.

आपली राजकीय सुरुवात बारामतीतूनच झाल्याचे सांगून व्हाॅईस ऑफ मीडियाचे तीन वर्षांत संघटनेने केलेले काम कौतुकास्पद आहे. गेल्या तीन – चार वर्षात देशाची सामाजिक परिस्थीती बिघडत आहे. त्यात सुधार करण्याचं काम सरकारने करायला पाहिजे. त्यात पत्रकारांची भूमिका मोठी राहणार असल्याचं सांगितलं.

दडपशाहीचे धोरण समाजहिताला मारक आहे – खा.कुमार केतकर

पत्रकारिता हे जागतिक पातळीवर अत्यंत बिकट होत आहे. गेल्या ९ -१० महिन्यात मणिपूर संघर्ष मिडिया पासून दूर आहे. सामाजिक सुरुंग लावले जात आहेत. जाती -पाती मध्ये जाणीवपूर्वक संघर्ष पेटविले जात आहे. काश्मीरमध्येही पत्रकारितेवर बंधने आहेत. ही परिस्थिती आशियाई देशांमध्ये आहे. या परिस्थीतीतून पत्रकारितेला बाहेर काढण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाने पुढाकार घ्यावा. ही माणस किती धडपडी आहेत, याची अनुभूती आली. त्यांनी हाती घेतलेले शिवधनुष्य मोठे आहे. आज जगातील पत्रकारिता अडचणीत आली असून ती स्वतंत्र नाही.

पुढचा सेमिनार ईशान्य भारतात घ्या. तो भाग अडचणीत आहे, याची जाणीव इतर भागात नाही.

मणिपूर मध्ये चार पत्रकार ठार मारले आहेत. भारतीय सैन्य आसामा रायफल ला देखील टार्गेट केले जात आहे. प्रक्षोभक यादवी सदृश्य परि्थिती गंभीर बनली आहे. प्रस्तापित सरकार विरोधात वातावरण आहे. २०२४ मध्ये देशातील वातावरण चिघळू शकेल अशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुका ह्या ट्रेलर आहेत. नंतर पिक्चर मोठा राहणार आहे.

वास्तविक चित्रण करने पत्रकाराना कठीण होऊन बसल असल्याचे म्हटले..

NewsToday24x7

Next Post

खासदार सांस्कृतिक महोत्सवात संविधान दिनी परित्राण पाठ, 51 पूज्य भन्तेजी देणार बुद्धांच्या मानवतेचा संदेश

Mon Nov 20 , 2023
नागपूर :- केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होणार असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी ‘परित्राण पाठ’चे आयोजन करण्यात येत आहे. या परित्राण पाठच्या आयोजना संदर्भात माजी नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत माजी नगरसेवक संदीप गवई, सतीश सिरसवान, आशिष वांदिले, सुधीर जांभुळकर, भैय्यासाहेब दिघाने, वंदना भगत, नागेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com