नागपुर :- अमेझॉन इंडिया लिमिटेड ही कंपनी एक इ-कॉमर्स वेबसाइट असून विविध प्रकारचा वस्तू आपण आपल्या www.amazon.in या वेबसाईट चा मार्फत विकतात.
काही दिवसा आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला अमेझॉन वरून काही सामान मागवतांना अचानक पाकिस्तानचा झेंडा विकण्याकरिता दिसला.
या विषयावर अजून माहिती गोळा करतांना आम्हाला हे समजले की अमेझॉन इंडिया लिमिटेड ही कंपनी आपल्या वेबसाइट वर जवळपास १०-१५ विविध आकारात व स्टाइल मधे पाकिस्तानचे झेंडे विकते.
सोबतच आपली कंपनी “Deadly Bhagavat Geeta” हे हिंदू विरोधी पुस्तक देखील आपल्या वेबसाइट चा मार्फत विकल्या जात आहे.
आपणास माहिती असेलच की पाकिस्तानचा कुरापतीमुळे भारतीय सैन्यांना वीरमरण येते ,पाकिस्तानचा नालायक कृत्यामुळे देशांतर्गत सामान्य भारतीयांचा जीव जातो तसेच देशातील काही असामाजिक तत्व हे अधून मधून देश विरोधी आंदोलनामध्ये पाकिस्तानचे झेंडे फळकवतात जी एक अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे, परंतु या असामाजिक व देशविरोधी तत्वांना हे पाकिस्तानचे झेंडे मिळतात कुठून हे या आपल्या तुच्छ आणि नीच कृत्यामुळे स्पष्ट झालेल आहे.
अर्थातच अमेझॉन इंडिया हे पाकिस्तान चे झेंडे लोकांना घरपोच देऊन देश विरोधी तत्वांना देशा विरुद्ध कार्य करण्यास मदत तर करतच आहे सोबतच काही देशांतर्गत देशद्रोह्यांना प्रवृत्त देखिल करते आहे.
उपरोक्त विषयावर एकंदरीतच हे लक्षात येते की अमेझॉन इंडिया लिमिटेड द्वारे घरपोच पाकिस्तानचे झेंडे विकणे हे निर्विवादास्पदपणे एक देशद्रोहाचे कृत्य आहे ज्यामुळे पुढे जाऊन देशात पाकिस्तानचे झेंडे झळकाऊन दंगे होऊ शकतात किंबहुना याधीही आपल्या देशात पाकिस्तानी झंडे झळकावण्यात आलेले आहे आपल्या भारत देशा विरुद्ध नारे लावण्यात आलेले आहे व या सर्वांकरिता फक्त अमेझॉन इंडिया लिमिटेड हीच कंपनी जबाबदार राहिल व आहेच.
सोबतच “Deadly Bhagavat Geeta” नावाचे भगवत गीतेला खराब ठरवणारे पुस्तक विकून अमेझॉन इंडिया लिमिटेड ही कंपनी हिंदू धर्मीयांचा धार्मिक भावनांना दुखविण्याचे काम करीत आहे.
या सर्व कारणास्तव आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आपणास इशारा देतो की आपण तात्काळ पाकिस्तानी झेंडे तसेच पाकिस्तानी झेंड्यांची प्रतिकृती असलेल्या वस्तू आपल्या online प्लेटफॉर्म वरुण काढून टाकावे व तसे पत्रच मा.राजसाहेब ठाकरे यांच्या नावे द्यावे तसेच समुर्ण भारत देशातील लोकांची माफी मागण्याचे पत्र राज ठाकरे यांच्या नावाने द्यावे. आम्ही इथेच न थांबता पुर्ण खात्रीने आपणास सांगू इच्छितो की जोपर्यंत आपल्या कंपनी विरोधात
देशविरोधी कृत्य करणे,तसेच देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे ,भारतीय सैनिकांचा अपमान करणे,देशभक्त भारतीय जनतेचा अपमान करणे ,दशांतर्गत व भारतीय सीमेवर पाकिस्तान कडून झालेल्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सामान्य भारतीयांच्या तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या मृत्यू चे जवाबदार व हिंदू धर्माचा अपमान करणे याकिरीत IPC च्या उचित कलमांचा वापर करुण फौजदारी स्वरूपाचा गुन्हा म्हणजेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही.