गॅस दरवाढीवरुन महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ;विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार घोषणाबाजी…

मुंबई  – होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी… संपला निवडणूकीचा तडाका, झाला गॅस दरवाढीचा भडका… रद्द करा रद्द करा… गॅस दरवाढ रद्द करा… खोके सरकार आले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले… खोके सरकार आले गॅस दरवाढीचे विघ्न आणले…

पुण्यात नाही चालले खोके उदास झाले बोके…या सरकारचं करायचं काय, गरीबांच्या घरात जेवण नाय… शेतकऱ्यांची लाईट तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… बळीराजाला द्या लाईट नाहीतर शेतकरी देईल फाईट.. महाराष्ट्राला द्या लाईट नाहीतर शेतकरी करतील टाईट… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढ विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे बॅनर फडकवून केला निषेध..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थ्यांनी रेखाटली देशाच्या जडणघडणीवर चित्रे, रासेयो राष्ट्रीय एकता शिबिरात पोस्टर मेकिंग स्पर्धा

Thu Mar 2 , 2023
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहा दिवसीय निवासी राष्ट्रीय एकता शिबिरात विद्यार्थ्यांनी देशाच्या जडणघडणीबाबत चित्रे रेखाटली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील जवळपास ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांच्या नियोजनात ही स्पर्धा पार पडली. शब्दांपेक्षा चित्रे अधिक बोलकी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com