रामटेक :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल गंगाधरराव बरबटे यांचे निवडणूक चिन्ह ‘मशाल’ च्या प्रचारार्थ शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांनी आज दिनांक रोजी रामटेक येथील गांधी चौकात प्रचाराची शिवसेनेच्या शैलीत तोफ डागली.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या प्रराचार्थ रामटेक येथील गांधी चौकात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जाधव यांनी विरोधकांवर कडाडून हल्ला चडवीला.
महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल हे गद्दार आहे तर काँग्रेसचा बंडखोर राजेंद्र मुळक हा विश्वास घातकी आहे अशा शब्दात त्यांनी उपस्थित सभेला संबोधित केले. तर दुसरीकडे संकट कळात उद्धव साहेबांच्या सोबत असणारा निष्ठावंत शिवसैनिक, सुशिक्षित, कुशल उद्योजक विशाल गंगाधरराव बरबटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून रामटेक विधानसभेच्या निवडणीकीच्या रिंगणात उभे आहे.
ज्यांचे उद्दिष्ठ पद प्राप्त करून पैसा कमविणे नसून सर्व सामान्य गोर गरिबांची सेवा करणे,विधानसभा क्षेत्रात विविध उद्योग आणून बेरोगारांच्या हाताला काम देने, महिला भगिनींचे संरक्षण करणे, रामटेक गड मंदिराचा सर्वांगीण विकास करणे, शेतकऱ्यांना न्याय देने, विधानसभा क्षेत्रातील शालेय शिक्षण व आरोग्य व्यवस्थेचा दर्जा वाढविणे असा आहे.
सदर प्रचार सभेला भास्कर जाधव यांच्या सह शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे असंख्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
या प्रचार सभेचे नियोजन तालुका प्रमुख हेमराज चोखांद्रे यांनी केले होते.