जनसंवाद सभेत आमदार बावनकुळेनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठीकरांना हिवाळी अधिवेशनादरम्यान दिवाळी भेट मिळणार!

कामठीतील पाच हजार अतिक्रमण धारकांना राज्याचे उपमुख्यमंत्रीच्या हस्ते पट्टे वितरण होणार!

कामठी :- कामठी तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित समस्याचे तडकाफडकी निराकरण करीत लोकसेवा द्यावी तसेच प्रशासनिक अडी अडचणी दूर होऊन समस्या मार्गी लागाव्या यासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार टेकचंद सावरकर यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी येथील एम टी डी सी सभागृहात आज 9 नोव्हेंबर ला दुपारी 3 वाजता जनसंवाद सभा आयोजित करण्यात आले होते. या सभेत तालुक्यातील समस्त प्रशासकीय अधिकारीच्या ताफ्यासह लोकप्रतिनिधी व समस्याग्रस्त नागरिक उपस्थित होते.यावेळी न्यायिक प्रतीक्षेत असलेल्या हजारोच्या संख्येतील आलेले अर्ज लक्षात घेत आमदार बावनकुळे यांनी संतप्त भूविका घेऊन मागील दोन वर्षात कामठी तालुका उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने समस्त अधिकाऱ्यांना धारेवर घेत एसडीओ, तहसीलदार,गटविकास अधिकारी,मुख्याधिकारी, आदी तालुकाप्रमुख अधिकाऱ्यांना धारेवर घेऊन त्यांचा चांगलाच क्लास घेतला त्यात अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर संतप्त होऊन अधिकाऱ्यांच्या बदली करण्याची तंबी दिली.दरम्यान कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या 5 हजारच्या जवळपास अतिक्रमण धारकांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिवाळी अधिवेशन दरम्यान पट्टे वितरित होणार असून यातून कामठीकरांना दिवाळी भेट मिळणार असल्याची घोषणा माजी पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर,माजी जी प सदस्य अनिल निधान, जी प सदस्य मोहन माकडे, कामठी पंचायत समीतीचे माजी सभापती उमेश रडके , एसडीओ श्याम मदनूरकर, तहसीलदार अक्षय पोयाम, बीडीओ अंशुजा गराटे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले,मुख्याधिकारी संदीप बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लीना पाटील आदी तालुका प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या जनसंवाद बैठकीत कामठी नगर परिषद तर्फे येथील प्रलंबित असलेले श्वान नसंबंदी तसेच डुक्कर पकडो मोहीम मुळे मोकाट कुत्रे आणि डुकरांचा बंदोबस्त करणे, पांदण रस्ता समस्या,ग्रामिन भागातील हायमास्ट लाईट, पांदण रस्त्याचा विषय मूलभूत सुविधे अंतर्गत मार्गी लागणे,कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविकाच्या रिक्त जागा भरणे,अतिवृष्टीच्या कामाचा ठपका आदी तक्रारी समस्यांचा पाढा वाचला.त्यातच येथील शासकीय अधिकारी मागील दोन वर्षांपासून वाऱ्यावर असून कुणी वाली नसल्याचा गृहीत धरून तालुका प्रमुख अधिकारी सह इतर शासकीय अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नसून घरभाडे भत्ता उचलत आहेत त्यातही अधिकारी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात दौरा करीत नाही , नगर परिषद चे मुख्याधिकारी ने दररोज सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान शहरात फटका मारून नागरी समस्यांची जाणीव घेणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसून येत नाही ,तलाठी , मंडळ अधिकाऱ्यांनी 21 पाणी नमुने उल्लेखित करणे आवश्यक आहे मात्र या प्रशासकीय कामात अधिकाऱ्यांचा कुठलाही राम नसल्याने नागरिकाच्या तक्रारींचे समाधान होऊ शकले नसल्याने आज नागरिकांच्या तक्रारींची संख्या हजारोच्या घरात आली यावरून आमदार बावनकुळेनि संताप व्यक्त केला.व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त भटके विमुक्त, वंचित, उपेक्षित, आदिवासी तसेच भोई व पारधी समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता पक्ष रस्त्यावर उतरणार- भाऊसाहेब बावणे

Thu Nov 10 , 2022
मुंबई येथील भारतीय जन सम्राट पक्षाच्या बैठकीत नगर पालिका आणि महानगरपालिका निवडणुका लढण्याचा निर्णय मुंबई :- भारतीय जन सम्राट पार्टीची राज्यव्यापी बैठक व्यंजन हॉल अंधेरी वेस्ट मुंबई येथे बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर 22 रोजी पार पडली या वेळी महाराष्ट्रात होणाऱ्या नगर पालिका व महानगरपालिका निवडणुकीत पक्ष आपले उमेदवार लढविणार असून महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी त्या करीता सज्ज राहण्याचे आवाहन उदघाटन पर भाषणात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com