नागपूर :- गुरूवार दि. 13 जून 2024 रोजी दुपारी 12.45 वाजता घामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सात पिडीत लोकांच्या परिवारांना दि. 15.06.2024 रोजी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांना नागपूर ग्रामीणच्या तहसिलदारांनी शासनातर्फे आलेले मदतीचे चेक दिले. ते घनादेश आमदार अभिजित वंजारी तसेच आमदार सुधाकर अडबाले यांनी मृतकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक वारसांना मदत म्हणून चेकद्वारे प्रत्येकी रु. 25 लाख प्रदान करण्यात आले.
घामना येथील चामुंडी एक्स्पलोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात प्राजंली किसना मोंदरे (22, धामना), वैशाली आनंदराव क्षिरसागर (20, घामना), प्राची श्रीकांत फलके (19, घामना), मोनाली शंकरराव अलोणे (25, धामना), पन्नालाल बंदेवार (60, सातनवरी), शितल आशिष चटप (30, सातनवरी) व दानसा मरस्कोल्हे (26. मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला.
मृत पावलेल्यांच्या परिवारास जोपर्यंत शासनातर्फे मदत मिळणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुनिता गावंडे यांनी दिला होता. माजी जिल्हा परिषद सदस्या भारती पाटील, जिल्हा परिषद सदस्य अविनाश पारधी, उपसभापती सुनंदा सातपुते, शैलेश थोराणे, अध्यक्ष, वाडी काँग्रेस कमेटी हे सुध्दा या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होते.