चोर समजून दोन युवकांना गावकऱ्यांनी दिला चोप..

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

खडकी बाम्हणी गावातील घटना..

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील डूग्गीपार गावात काही दिवसापासून शेळ्या चोरीच्या घटना सुरु असल्याने दोन संशयित युवकांना चोर समजून गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सड़क अर्जुनी तालुक्यातील खडकी बाम्हणी गावात घडली आहे. अखेर डूग्गीपार पोलिसांना स्वाधिन केल्या नंतर गावकारी निघाल्याने पोलिसांनि त्यांना सोडले आहे. दरम्यान या मारहानीचा वीडियो प्रचंड वायरल होत आहे. खडकी बाम्हनी गावात मागिल 10 दिवसापासून शेळ्या चोरीच्या घटना सुरु असल्याने गावकरी दहशति मध्ये आहे. त्यामुळे गावात अनोळखी व्यक्ती आला कि त्यांची विचारपूस केली जात असे मात्र काल गावात दोन अनोळखी व्यक्ती आलें होते, उचित उत्तर न मिळाल्याने गावकऱ्यांनी हेचं व्यक्ती शेळ्या चोर असल्याच्या संशयात दोन्ही व्यक्तींना लाठ्या काठ्यानी मारहाण केली व त्यांनतर डूग्गीपार पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आता हे मारहाणीचे व्हिडिओ चांगलेच वायरल होत असल्याने याची चौकशी पोलिस करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

धापेवाड्याच्या चंद्रभागेत तरुण बुडाला..

Fri Sep 2 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी विदर्भ पंढरी मंदिरासमोरील घटना कळमेश्वर  –विदर्भाचे पंढरपूर म्हणून सर्व दूर परिचित असलेल्या विदर्भ पंढरी धापेवाड्या च्या चंद्रभागा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता घडली. अक्षय यशवंता चौधरी वय 23 वर्ष असे मृतक तरुणाचे नाव असून सावनेर तालुक्यातील वाकोडी गावामध्ये नात्यातील कुटुंबियाकडे मयत झाल्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com