संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– आजपासून बेमुद्दत साखळी उपोषण
कामठी :- नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या येरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत लोकसंख्या ही 35 हजाराच्या घरात असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे येरखेड्यात विविध मूलभूत समस्यांचा डोंगर साचला आहे.तसेच ग्रा प च्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विकासकामे खोळंबली आहेत.परिणामी ग्रा प प्रशासन निष्क्रिय ठरत आहे.तेव्हा गावाचा विकास हाच एक ध्यास मनात धेरून विकासात्मक दृष्टिकोनातुन येरखेडा ग्रा प ला नगर पंचायत चा दर्जा मिळणे आवश्यक आहे मात्र सत्तेच्या लालसेपोटी येरखेडा ग्रा प प्रशासन नगरपंचायत प्रस्तावाला मंजुरी देत नसल्याने येरखेडा ग्रामस्थ संघर्ष समितीने येरखेडा ग्रा प ला नगर पंचायत चा दर्जा मिळवून देण्यासाठी आज 21 ऑगस्ट पासून येरखेडा नवीन ग्रा प कार्यालय समोर मागणी पूर्ण होईपर्यंत आरसा दाखवा आंदोलन सह बेमुद्दत साखळी उपोषण पूकारले आहे.
या साखळी उपोषणात ऍड आशिष वंजारी, मनीष कारेमोरे, गजानन तिरपुडे,राजकीरण बर्वे,शितल चौधरी, नरेश मोहबे, राजश्री घिवले,राजेश पिप्पीवार,विलास पाटील,प्रवीण आगाशे, अरुण कुशवाह,राजेंद्र बैस,गणेश नायडू,आसिफ पठाण,कुणाल गद्दमवार,प्रमोद वंजारी,बांदल भस्मे,पोपट श्रावणकर,मुकेश कनोजे,शुभम चौधरी आदी उपस्थित होते.