कोळसा मंत्रालय व्यावसायिक कोळसा ब्लॉक लिलावाची दहावी फेरी सुरू करणार

– 62 ब्लॉक्स विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता

नवी दिल्ली :- 2047 पर्यंत ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्याच्या आणि कोळसा क्षेत्रात ‘आत्मनिर्भर (स्वावलंबी)’ बनण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री, जी किशन रेड्डी पुढील आठवड्यात व्यावसायिक कोळसा ब्लॉक (क्षेत्र) लिलावाच्या दहाव्या फेरीचा शुभारंभ करतील. या व्यवहारात संपूर्ण पारदर्शकता राहील, तसेच जास्तीतजास्त महसूल जमा होईल, हे सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

लिलावाच्या 10व्या फेरीदरम्यान, अंतिम वापरकर्त्याच्या निकषाशिवाय सुमारे 62 ब्लॉक्स विक्रीसाठी उपलब्ध केले जातील अशी शक्यता आहे. या व्यावसायिक ब्लॉक्समधून उत्पादन झालेला कोळसा वापरकर्त्यांना खुल्या बाजारात विकण्याची परवानगी आहे. पंतप्रधानांनी जून 2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव सुरू केला होता. तेव्हापासून, गेल्या 9 फेऱ्यांमध्ये, कोळसा मंत्रालयाने 256 मेट्रिक टन (MT) सर्वाधिक क्षमतेसह 107 कोळसा खाणींचा यशस्वीपणे लिलाव केला आहे.

आतापर्यंत 11 व्यावसायिक कोळसा खाणी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी 17.5 मेट्रिक टन कोळशाचे व्यावसायिक ब्लॉक्समधून उत्पादन झाले.

कोळसा मंत्रालयाने पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅनवर कोळसा ब्लॉक पोर्टल विकसित केले आहे, ज्यामुळे बोलीदारांना कोळसा खाणींबाबत भौगोलिक माहिती मिळायला मदत होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद वाहनासह एकूण २०,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Sat Jun 15 , 2024
मौदा :-पोस्टे मौदा येथील स्टाफ पो. स्टे. हद्दीत अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना भंडारा ते नागपूर NH-53 रोडवर टिप्पर क्र. MH-40/BL- 1000 हा येताना दिसल्याने बोरगाव शिवारातील महादुला फाट्याजवळ नाकाबंदी दरम्यान टिप्परला थांबवून पाहणी केली असता १० चाकी टिप्पर क्र. MH-40/BL-1000 मध्ये अंदाजे ६ ब्रास रेती मिळून आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी चावत विचारले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com